राहाता येथील दोघांनी एकास उचलून बंदुकीचा धाक दाखवत पन्नास लाखाचा चेक लिहून घेतला आणि फिर्यादी कडून नोटरी करून घेतली असल्याची फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे फिर्यादीत म्हटले आहे कि माझे नाव रविश्री वेराबत्रराव कंदुला . मी साकुरी शिवारात शेत गट नं. 356 मध्ये आठ एकर क्षेत्र सन 2006 मध्ये घेतले होते
सदर क्षेत्राचे प्लॉटींग करुन ते मी लोकांना आडीच लाखात बुक करुन दिले होते. परंतु सदर क्षेत्र हे एन ए प्लॉटींग न होता त्यास कोर्टाचा स्टे लागल्याने प्लॉटींग है मला बुक केलेल्या लोकांना दिलेले नाही त्यामुळे मी त्या लोकांना पैसे परत केले होते. त्यातील इसम नामे अशोक टकाजी बडांगे रा. साकुरी ता. राहता यांना मी पैसे परत देवु केले
परंतु त्यांनी सांगीतले तुमचे कोर्ट मॅटर संपल्या नंतर मला जागा या त्यानंतर ते सन 2013 मध्ये मयत झाले त्यांचा मोठा मुलगा आणि त्याचे नातेवाईक ते माझ्याकडे आले आणि त्यांनी आमची दोन गुंठे जागा आम्हाला द्या आम्हाला पैसे नको असे म्हणाले होते.त्यानंतर
दिनांक, 21/07/2025 रोजी दुपारी 04/00 वाजेचे सुमारास मी माझे साकुरी येथील ग्रीन पार्क येथे असतांना तेथे पप्पु बंडागे, अंकुश बंडागे व इतर दोन अनोळखी इसम आले ते मला म्हणु लागले कि तु आमचा फोन उचलत नाही असे म्हणुन ते मला हाताचापटीने लाथाबुक्क्यांनी मारहान करुन तु आज आम्हाला पंन्नास लाख रुपये व तुझे घर आमचे नावावर करुन दे असे म्हणुन मला वाईट वाईट शिवीगाळ करुन तुला आज येथेच मारुन टाकु असा दम दिला
नंतर मला त्यांनी एका सफेद रंगाच्या गाडीत बसवले आणि त्यातील एकाने माझे डोक्याला बंदुक लावुन म्हणाला कि, तुझ्या बंगल्याची नोटरी आम्हाला करुन दे असे म्हणून मला राहता येथील एका वकीलाकडे नोटरी केली नंतर त्यांनी माझ्याकडुन एका पन्नास लाखाच्या चेकवर सही करुन घेतली त्यानंतर मी त्यांना म्हणालो कि, माझी उद्या औरंगाबाद येथे कोर्टात तारीख आहे तर मला नगरसुल येथील वकीलांना भेटायचे आहे.
असे म्हणालो म्हणुन त्यांनी माझे सोबत तिन इसम असे आम्ही नगरसुल रेल्वे स्टेशनला आलो तेथुन मी डायल 112 फोन केला तेथे पोलीस मदत बोलावली तेथे पोलीस कर्मचारी आले त्यांना मी माझी वरील तक्रार सांगीतली म्हणुन त्यांनी मला तक्रार देण्यासाठी तुम्ही पोलीस स्टेशनला जा असे सांगीतल्याने मी येवला तालुका पोलीस स्टेशन येथे पप्पु बंडागे, अंकुश बंडागे रा. साकुरी ता. राहता जि. आहिल्यानगर व इतर दोन अनोळखी इसम यांचे विरुध्द तक्रार दाखल केलेली आहे.