Letest News
अपहरणं करून डोक्याला बंदूक लावत पन्नास लाखाच्या चेकवर सही करून घेतली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश हिरे सुवर्णविजेते पदकचे माणकारी शनि शिंगणापूर देवस्थानचे तत्कालीन विश्वस्थ व उप कार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी गळफास घेऊन केली आ... कोपरगावात जप्त वाहनांचा २९ जुलै रोजी लिलाव बँकेच्या सेटलमेंट नावाखाली एकाची फसवणूक चार लाखाला घातला गंडा  शिर्डी तेथील ठकसेन भूप्या सावळेच्या अडचणीत वाढ आजून ३२८ गुंतवणूक धारकांनी गुन्हे नोंदविले  गुन्हेगारांना खाकीचा धाकच राहिला  चक्क महिला पोलिसाचा भररस्त्यावर मंगळसूत्र चोरांनी लांबविला   शिर्डीतून चोरीला गेलेल्या तीन कोटी वीस लाखाचे सोने पैकी ७५ लाख रुपये एल सी बीने हडप केले? श्री साईबाबा संस्थान नाट्य रसिक मंच व शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने 25 तारखे पासून पाराय... पुन्हा शिर्डी येथील साईबाबांचे मंदिर उडविण्याची धमकी
अ.नगरशिर्डी

श्री साईबाबा संस्थान नाट्य रसिक मंच व शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने 25 तारखे पासून पारायण सोहळ्याचे आयोजन

शिर्डी:-
श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी, नाट्य रसिक मंच, शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्‍थ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने शुक्रवार दिनांक २५ जुलै, २०२५ ते शुक्रवार दिनांक ०१ ऑगस्‍ट २०२५ या कालावधीत साईआश्रम भक्‍तनिवास येथील शताब्‍दी मंडपात श्री साईसच्चरित पारायण सोहळ्याचे आयोजन करणेत आले असून या सोहळ्या दरम्‍यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत.
श्रावणमासा निमित्त दरवर्षी श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी व नाट्य रसिक मंच, शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्‍थ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने श्री साईसच्चरित पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही श्री साईसच्‍चरित पारायण सोहळा हजारो पारायण वाचकांच्‍या उपस्थितीत साजरा करण्‍यात येणार आहे. या पारायण सोहळ्यानिमित्त दररोज धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले असून, सर्व सांस्‍कृतिक कार्यक्रम गेट क्र. ३ समोरील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्‍दी मंडपात होणार आहे. पारायण सोहळ्याचे हे ३१ वे वर्ष असून सकाळी ०७.०० ते ११.३० यावेळेत (पुरुष वाचक) व दुपारी ०१.०० ते ०५.३० यावेळेत (महिला वाचक) यांचे श्री साईसच्‍चरित पारायण वाचन होईल.
प्रथम दिवशी दिनांक २५ जुलै रोजी सकाळी ०६.०० वाजता समाधी मंदिरातून पोथी व फोटोची पारायण मंडपापर्यंत मिरवणूक काढणेत येईल, मिरवणूक पारायण मंडपात पोहचल्‍यानंतर तेथे ग्रंथ व कलश पूजन होवून पारायणास सुरुवात होईल. सायंकाळी ०५.३० ते ०६.३० यावेळेत महिला पारायणार्थीसाठी हळदी कुंकू समारंभ व रात्रौ ०७.०० ते ०९.०० यावेळेत श्रीसाईबाबा शिक्षण प्रसारक मंडळ प्राथमिक विद्यामंदिर, शिर्डी यांचा सांस्कृतिक कार्यक्रम श्री साईआश्रम पारायण मंडप येथे होईल. रात्रौ ०७.३० ते ०९.३० यावेळेत ह.भ.प.श्री लहू महाराज कराळे, निमगाव श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर निमगाव को-हाळे, यांचा किर्तनाचा कार्यक्रम गेट क्र. ३ समोरील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्‍दी मंडपात होईल. दि. २६ जुलै रोजी दुपारी ०३.०० ते ०५.०० यावेळेत श्री साईकला मंच, हिंगणघाट वर्धा यांचा सांस्कृतिक कार्यक्रम श्री साई भजने, सायं.०५.३० ते ६.३० यावेळेत श्री ज्ञानदेव निवृत्ती गोंदकर, शिर्डी यांचा प्रवचन कार्यक्रम व सायं.७.३० ते रात्रौ ९.३० या वेळेत ह.भ.प.श्री हर्षद महाराज खैरनार, सिन्नर यांचा कीर्तन कार्यक्रम होईल. दि. २७ जुलै रोजी सकाळी ११.३५ ते ११.४५ डॉ. श्री नचिकेत वर्षे, शिर्डी यांचे पुरुष वाचकांसाठी तर सायं.०५.३५ ते ०५.४५ यावेळेत महिला वाचकांसाठी योग व आहार विषयक व्याख्यान (श्री साईआश्रम पारायण मंडप) येथे होईल. दुपारी ०३.०० ते ०५.०० यावेळेत साई सारंग बिट्स, मुंबई यांचा सास्कृतिक कार्यक्रम व सायं.०७.३० ते रात्रौ.०९.३० यावेळेत ह.भ.प.श्री.रामनाथ महाराज शास्त्री, सिन्नर यांचे कीर्तन होईल. दिनांक २८ जुलै रोजी सायं.०५.३० ते ०६.०० यावेळेत डॉ. श्री नचिकेत वर्षे, शिर्डी यांचे योग व आहार विषयक व्याख्यान व सायं.०७.३० ते रात्रौ.०९.३० ह.भ.प.श्री. साईदास बाळासाहेब हासे, इंदोरी यांचे कीर्तन होईल. दि. २९ जुलै रोजी दुपारी ०३.०० ते ०५.०० यावेळेत श्री साईबाबा कन्या विद्या मंदिर, शिर्डी शाळेच्या विद्यार्थीनींचा सांस्कृतिक कार्यक्रम, सायं.०५.३० ते ६.३० यावेळेत सौ. आशाबाई भानुदास गोंदकर, शिर्डी यांचे प्रवचन कार्यक्रम व सायं.७.३० ते रात्रौ ९.३० या वेळेत श्री ह.भ.प.कु.कृष्णा महाराज हजारे, शिर्डी यांचे कीर्तन होईल. दि. ३० जुलै रोजी दुपारी ०२.०० ते ०४.०० यावेळेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूल, शिर्डीच्या शालेय मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम, सायं.४.०० ते ६.०० यावेळेत श्री देव कुडाळेश्वर मित्र मंडळ, कुडाळ यांची साई भजन संध्या कार्यक्रम व सायं.०७.३० ते ०९.३० यावेळेत ह. भ. प. कु. ओंकार महाराज बोचरे, निमगाव श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर, निमगाव को-हाळे यांचा कीर्तन कार्यक्रम होईल. दि. ३१ जुलै रोजी दुपारी ०३.०० ते ०५.०० यावेळेत डॉ. विलासराव सोमवंशी, यांचा प्रवचन कार्यक्रम, सायं.५.३० ते ६.३० यावेळेत श्री. गोरक्षनाथ नलगे, चिंचोली ता. राहुरी यांचा श्री साईकथा कार्यक्रम व सायं.०७.३० ते रात्रौ ०९.३० यावेळेत ह. भ. प. सौ. सुजाताताई पाटील, नांदेड यांचा कीर्तन कार्यक्रम होईल. दि.०१ ऑगस्‍ट रोजी दुपारी ०२.०० ते ०३.०० यावेळेत ब्राम्हण एकता मंच, शिर्डी यांचे श्री विष्णू सहस्त्रनाम पठण कार्यक्रम व सायं.०७.३० ते ०९.३० यावेळेत ह.भ.प.श्री प्रसाद महाराज बोरडिकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होईल.
तर शुक्रवार दिनांक ०१ ऑगस्‍ट रोजी सकाळी ०७.०० ते ०८.०० यावेळेत पुरुष वाचक व सकाळी ०९.०० वाजता महिला वाचक अध्याय क्रमांक ५३ (अवतरणिका) वाचन होवुन ग्रंथ समाप्ती होणार आहे. दुपारी ३.०० वाजता गावातुन श्री साईसच्‍चरीत्र ग्रंथ (पोथी) मिरवणुक होईल. मिरवणूक परत आल्‍यानंतर वीणा पूजन होईल. दि. ०२ ऑगस्‍ट रोजी सकाळी १०.०० ते १२.०० यावेळेत पारायण मंडपात ह.भ.प.श्री वैभव प्रदीप ओक, डोंबिवली यांचे गोपाळकाला कीर्तन व त्‍यानंतर दुपारी १२.३० ते ०४.०० यावेळेत महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. तर, सायं.०७.३० ते ०९.३० यावेळेत ह.भ.प.श्री. भानुदास महाराज बैरागी यांचे एकनाथी भारुड कार्यक्रम होईल.
पारायण मंडपात सकाळी ७.०० ते ११.३० यावेळेत पारायणाच्‍या वेळी फक्‍त पुरुषच पारायण करतील व दुपारी ०१.०० ते ०५.३० यावेळेत फक्‍त महिलाच पारायण करतील. पारायणासाठी वाचकांनी ग्रंथ, श्रीफळ आणि बस्कर स्वत: आणावयाचे असून शालेय विद्यार्थी व १८ वर्षाच्या आतील वाचकांना प्रवेश दिला जाणार नाही. या पारायण सोहळ्यात जास्तीत जास्त साईभक्‍त व ग्रामस्‍थांनी सहभागी व्‍हावे असे आवाहन श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी, नाट्य रसिक मंच, शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्‍थ यांच्‍या वतीने करण्‍यात आले.
हा पारायण सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्‍थानचे तदर्थ समितीच्‍या अध्‍यक्षा तथा प्रमुख जिल्‍हा व सत्र न्‍यायाधीश अंजु शेंडे (सोनटक्‍के), समिती सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी डॉ.पंकज आशिया, भा.प्र.से, मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर भा.प्र.से. व उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांच्‍या मार्गदर्शनाखाली संस्‍थानचे सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व विभागांचे विभाग प्रमुख, नाटय रसिक मंचाचे सर्व पदाधिकारी, सर्व ग्रामस्‍थ व सर्व कर्मचारी प्रयत्नशिल आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button