
शिर्डी येथील ग्रोमोर नावाची कंपनी असल्याचे बोगस भासवून गोर गरिबांना लुटणारा ठकसेन भुप्या पाटील सह त्याचा बाप. चुलता भाऊ आणि इतर दोघांवर शहादा. राहाता व शिर्डी पोलीस स्टेशनला ठेवीदारांनी त्यांची फसवणूक झाल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे सध्या तो नंदुरबार एल सी बी च्या ताब्यात आहे

त्याला अधिक चौकशी साठी काल शिर्डीला आणले होते त्यावेळी त्यास त्याच्या राहात्या घरी घेऊन जाऊन चौकाशी करण्यात आली त्याने कुठं कुठं प्रॉपर्टी घेतली आहे याचीही कसून चौकशी करण्यात आली त्याची प्रॉपर्टी सील करण्यात आलेली आहे त्याच्या चेहेऱ्याकडे पाहून असे वाटत होते कि त्याला अटक झाल्यानंतरही काहीच फरक पडलेले नाही
यावरूनच कळत तो किती शातीर लुटारू आहे त्यास गोपनिय पद्धतीने शिर्डीत आणले आणि चौकशी करून पुंन्हा नंदुरबार येथे घेऊन गेले व उर्वरित आरोपी हे आजूनही मोकाट फिरत आहेत नंदुरबारच्या एल सी बी ने त्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यास अजमेर हुन अटक करून आणली आणि आपल्या अहिल्यानगर येथील एल सी बी ला उर्वरित आरोपी सापडत नाहीत
ह्यामुळे गुंतवणूक धारकांमध्ये संशय निर्माण होऊ लागला आहे ह्या विषयी बोलतांना प्रथम नगराध्यक्ष कैलास कोते यांनी सांगितले कि आहिल्यानगर पोलिसांनी यातील उर्वरित आरोपींना अटक करून शिर्डीत आणले पाहिजे त्यांच्या कडून चौकशी केली पाहिजे
जी रक्कम घेऊन तो फरार झाला त्या रकमेची विल्हेवाट कुठे लावली याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे
भूपेंद्र आणि त्याच्या सहकार्यांवर राहाता व शिर्डी येथे गुन्हा दाखल असल्याने त्यास लवकरच दोन्ही पोलीस स्टेशनं ताब्यात घेणार आहेत
भुप्या पाटीलला काल नंदुरबारच्या पोलिसांनी आणले शिर्डीत चौकशी करीत प्रॉपर्टी केली सील नंदुरबार एल सी बी ह्या आरोपीला अजमेर येथून अटक करतात मग अहिल्यानगर एल सी बी उर्वरित आरोपीना का अटक करीत नाही गुंतवणूक धारकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरु आहे
अहिल्यानगर पोलिसांनी उर्वरित आरोपीना त्वरित अटक करून पैश्यांची विल्हेवाट कुठं लावली याची माहिती घेऊन गोर गरिबांचे पैशे प्रत मिळण्यासाठी प्रयत्न करावे एका वर्षात पैसे दुप्पट आणि मासिक परताव्यावर चकाचक कमाईचे आमिष दाखवत ‘ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट फायनान्स’ या बनावट आर्थिक कंपनीने राज्यभरातील हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
या कंपनीविरोधात शिर्डी आणि राहाता पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांचा तपास पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशाने येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.