
साईबाबांच्या पवन भूमीत लोकांना ठगणारा भूपेंद्र पाटील वर शहादा येथे प्रथम गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यास नंदुरबार येथील स्थानिक गुन्हे अनवेशन विभागाने अजमेर येथून अटक केलेली आहे सध्या तो पोलीस कोठाडीत आहे. काल राहाता येथील सौं शीतल पवार यांनीही राहाता पोलीस स्टेशनला फसवणूकीची फिर्याद दाखल केली आहे
त्यात सौं शीतल याने म्हटले आहे कि आम्ही
साईबाबा रुग्नालय येथे गेलो होतो. तेथे श्री. साईबाबा संस्थान शिर्डी मधील कर्मचारी राजाराम भटु सावळे हे तेथील काही लोकांना ते स्वतः हा व त्याचा मुलगा भुपेंद्र राजाराम सादळे असे ग्रो मोर ईन्व्हेसमेन्ट फायन्सास या नावाची कंपनीत चालवित असुन त्यामध्ये गुंतवणुक केल्या नंतर त्याचा चांगला परतावा कसा मिळतो याबाबत माहीत सांगत होते.
त्यावरून त्यांनी माझे पती गोरखनाथ पवार यांचा मोबाईल नंबर घेतला व सांगीतले की, तुम्ही गणेशवाडी शिर्डी येथे या तेथे आमच्या कंपनीचे ऑफीस आहे. असे सांगितल्याने आम्ही तेथे गेल्यावर त्यांनी त्याचे कंपनीबद्दल आम्हाला माहीती देवून चांगला परतावा देण्याकरीता विश्वास देवुन आमचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर दोन ते तीन दिवसांनी 1) भुपेंद्र राजाराम साबळे 2) भाऊसाहेब आनंदराय थोरात 3) संदिप सावळे 4) सुबोध सावळे 5) राजाराम भटु सावळे सर्व रा. शिर्डी ता. राहाता जि. अहिल्यानगर अश्यांनी माझे पतीस नवनाथ मंदिर राहाता येथे आल्याचे सांगुन त्यांना फोन करुन तेथे बोलावुन घेतले तेथे माझे पतीस शिर्डी, राहाता व परिसरातील अनेक लोकांचे त्याचे कंपनीत गुंतवणुक केल्याची व त्यांना चांगला परतावा दिल्याची कागदपत्रे दाखवुन आम्हाला त्यांच्या कंपनीत गुंतवणुक करण्याकरीता आग्रह केला
त्यावरुन आम्ही घरी विचारविनिमय करून दि. 14/08/2024 रोजी माझे राहाता येथील बंधन बँकेचे खाते क्र 50225306091451 यावरुन ग्रो मोर ईन्च्छेसमेन्ट फायन्सास कंपनीच्या शिडी येथील एक्सेस बँक खाते नंबर 923020055392109 यावर 3,00,000/-रुपये RTGS व्दारे पाठविले त्यावरुन वरील लोकांनी सदर बाबत मला कंपनीचा करारनामा करुन दिला
त्यानंतर 3,00,000/-रुपयांच्या ठेवीवर मला दर महिण्याला 78,000/-रुपये असे पाच वेळेस परताया स्वरुपात कंपनीच्या मार्फतीने जमा करण्यात आले होते. त्यामुळे त्यांचे बोलण्यावर माझा विश्वास अधिक दृढ झाला होता. दि.10/12/2024 रोजी ग्रो मोर ईन्व्हेसमेन्ट फायन्सास कंपनीचे वरिल चालक यांनी हॉटेल केबीस् ग्रॅन्ड शिर्डी येथे स्नेहमेळावा आयोजित केला व मेळाव्यात आम्हाला सांगितले की, तुम्ही अजून आमच्या कंपनीत अधिक रक्कम गुंतवणुक करा व अधिक परतावा मिळवा,
असे प्रोत्साहित केल्याने आम्ही वेगवेगळ्या बचत गटाच्या माध्यमांतुन कर्ज घेवुन, हात उसने पैसे घेवुन एका वर्षा करिता 5,00,000/-रुपये दर महिणा परतावा 60.000/-रुपये तसेच एक वर्षांनंतर गुंतविलेले 5,00,000/-रुपये चेक ने परत मिळणार या बोलीवर आम्ही दि. 23/12/2024 रोजी त्यांचे एक्सेस बँक खाते नंबर 923020055392109 या अकाउंट नंबरवर माझे बंधन बँकेचे खाते क्र 50225306091451 वरुन RTGS व्दारे पाठविले होते.
त्यानंतर ठरल्याप्रमाणे दि. 28/01/2025 रोजी 60,000/-रुपये महिणा प्रमाणे एक महिण्याचे पैसे मला माझ्या बंधन बँकेच्या खात्यावर जमा झाले होते. त्यानंतर पहिले 3,00,000/- रुपये गुंतवणुक केलेला हप्ता हा वेळेत जमा न झाल्याने मी कंपनी चालक संदिप सावळे यांना फोन करून मासिक परतावा तसेच 5,00,000/-रुपये गुतवणुकीच्या चेक बाबत विचारपुस केली असता त्याने तांत्रिक अडचन आली असुन नंतर तुमचे पैसे जमा होईल असे सांगुन टाळाटाळ केली होती.
त्यानंतर मी व माझे पती असे आम्ही वरिल कंपनीचालक लोकांकडे मासिक परतावा बाबत वेळी फोन करून विचारणा केली असता त्यांनी आम्हाला आजारपणाचे कारणेसांगुन आज देतो उद्या देतो असे सांगून टाळाटाळ करुन त्यांनी त्यांचे मोबाईल नंबर बंद केल्याने मी व माझे पती असे आम्ही त्यांचे गणेशवाडी शिर्डी येथिल कार्यालयावर जावुन पाहीले असता ते बंद होते. तसेच त्याचे घरी गेलो असता ते त्याच्या कुटुंबासह पसार झाल्याचे दिसल्याने तसेच माझ्या पतीने ईतर कंपनीचे सदस्य यांचेकडे चौकशी केली
असता त्याचे देखिल फोन उचलत नसल्याचे सांगितल्याने माझी फसवणुक झाल्याचे मला समजले आहे. तरी दि. 14/08/2024 रोजी तसेच दि.23/12/2024 रोजी ग्रो मोर ईन्च्डेसमेन्ट फायन्सास कंपनी शिर्डीचे चालक नामे 1) भुपेंद्र राजाराम सावळे 2) भाऊसाहेब आनंदराव थोरात 3) संदिप सावळे 4) सुबोध सावळे 5) राजाराम भटु सावळे सर्व रा. शिर्डी ता. राहाता जि. अहिल्यानगर अशांनी तुम्हाला चांगला परतावा देतो.
असे सांगितल्याने मी माझे बंधन बैंक राहाता खाते क्र 50225306091451 यावरुन अनुक्रमे 3,00,000/- रुपये च 5,00,000/-रुपये असे त्यांचे वरिल कंपनीत गुंतवणुक केली असुन ठरल्याप्रमाणे मासिक परतावा न देता माझा विश्वास संपादन करुन माझी फसवणुक करुन ते पसार झाले आहे.
म्हणुन माझी वरिल सर्व ईसमांविरुद्ध कायदेशिर फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे आरोपीन्ना आजून अटक करण्यात आलेली नाही अशी माहिती राहाता पोलीस स्टेशनंचे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी दिली आहे पुढील तपास राहता पोलीस करीत आहेत