शिर्डी प्रतिनिधी शिर्डी येथील साईबाबांच्या मंदिरात तेलंगणा राज्यतील हैद्राबाद येथील ज्योत्सना देवी यांचे मंदिरातील शांती हॉल जवळ आल्यावर त्यांच्या लक्षात आले कि आपल्या हातातील सोन्याचा कडा कुणीतरी चोरून नेला किंवा गहाळ झाला असल्याचे लक्षात येताच त्यांनी शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे त्यात म्हटले आहे कि
दि. 17/06/2025 रोजी पहाटे 04/20 वा. चे. सुमारास मी हॉटेल सन अॅण्ड सॅण्ड शिर्डी येथुन निघुन साईबाबांच्या दर्शनाकरीता निघालो असता गेट क्र। ने व्हीआयपी गेटने दर्शन लाईनमध्ये असताना शांती तळमजला हॉल येथे रांगेत असताना माझ्या लक्षात आले की, माझ्या हातात असलेले सोन्याचे कडे हे हातामध्ये नाही.
असे लक्षात आले असता मी माझे पती यांना माझ्या हातातील कडे नसलेबाबत सांगितले म्हणुन आम्ही जवळच असलेले सिक्युरीटी गार्ड यांना कळविले. तेव्हा आम्ही प्रवेश केलेल्या गेटपासुन ते शाती हॉलपर्यंत सगळीकडे माझ्या हातातील कड्याचा शोध घेतला
तसेच हॉटेलवर फोन करुन माझे कडे सापडले आहे कींवा कसे याबाबत चौकशी केली परंतु मला काहीएक माहीती मिळाली नाही. माझे हातातील कडे चोरी गेले किंवा कोठेतरी पडुन गहाळ झाले आहे याबाबत मला काही आठवत नाही. माझे हातातील कड्याचे वर्णन खालीलप्रमाणे, 1) 1,60,000/-रु किं.चे सोन्याचे पांढ-या रंगाचे खडे असलेले चार तोळे वजनाचे हातातील कडे जु.वा.किं.अं 1,60,000/-/- एकूण
तरी साईबाबा मंदिर परिसरात शांती तळमजला हॉल येथे रांगेत शिर्डी येथून वरील वर्णनाचे व किंमतीचे हातातील कडे कोणीतरी अज्ञात चोरटयाने माझे संमतीशिवाय, लबाडीचे इरादयाने स्वतःचे फायदया करीता चोरुन नेले आहे किंवा कोठेतरी पडुन गहाळ झाले आहे
म्हणून माझी अज्ञात चोरटया विरुध्द गुन्हा रजिस्टर नंबर 0657/2025 भारतीय न्याय संहिता 303(2) प्रमाणे शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस करीत आहेत