कोपरगाव शहरात दिनांक 19/9/2024 रोजी मागील भांडणाचे कारणावरुन घडलेल्या गोळीबाराचे घटने अनुषंगाने दाखल कोपरगांव शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. 423/2024 बीएनएस कलम 109 (1), 126 (2), 189(4), 191(3) आर्म अॅक्ट 3/25,25,27 या गुन्हयातील मुख्य आरोपी नाजीम इस्लाउददीन शेख
रा. झेंडागल्ली, गांधीनगर कोपरगांव ता. कोपरगांव जि. अहिल्यानगर याचे विरुदध वर नमुद गुन्हयासह इतर पाच गंभीर स्वरुपाचे शरीराविरुदधचे गुन्हे दाखल आहेत.
नमुद आरोपी नाजीम इस्लाउददीन शेख रा. झेंडागल्ली, गांधीनगर कोपरगांव ता. कोपरगांव जि. अहिल्यानगर याचेविरुदध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 56 अन्वये हददपार प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता, त्यामध्ये मा. उपविभागीय दंडाधिकारी, शिर्डी भाग यांनी सदर आरोपी यास दिनांक 30/6/2025 रोजी एक वर्षाकरिता अहिल्यानगर जिल्हा,
तसेच नाशिक जिल्हयातील निफाड, सिन्नर, येवला, व छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील वैजापुर या तालुका हददीचे बाहेर हददपार केलेले आहे. याच घटनेतील इतर आरोपी तनवीर रंगरेज याला देखील यापुर्वीच दिनांक 12/2/2025 एक वर्षाचे कालावधीसाठी हददपार करण्यात आलेले आहे.
या घटनेतील अमर बाळु भोसले रा. प्रवरानगर ता. राहाता याचेवर देखोल सदरच्या गोळीबाराच्या घटनेनंतर MPDA अंतर्गत कारवाई करण्यात आलेली होती. तसेच या गोळीबारामध्ये समाविष्ट इतर आरोपी विरुदध देखील त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्हयांचे संख्येप्रमाणे वेळोवेळी योग्य ती प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे.
शिर्डी उपविभागातील दोन किंवा दोन पेक्षा अधिक चे गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांवर तसेच गुन्हेगारी टोळयांवर हददपारीची कारवाई सुरु असुन हददपारीचे आदेश झालेले असतांना तसेच हददपारीची कार्यवाही सुरु असतांनाही हददपार आदेशाचा भंग करुन पुन्हा गुन्हे करणारे इसमांविरुदध महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले,

औषधीद्रव्य गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालनेबाबतचा अधिनियम सन 1981 (MPDA) तसेच महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 (मोका) अन्वये कारवाई करण्यात येणार आहे.अशी माहिती शिर्डी विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष वमणे यांनी दिली आहे