
साईबाबांच्या पावनस्पर्शाने पुनीत झालेल्या शिर्डीचे नाव बदनाम करणारा भुप्या पाटलाला नंदुरबारच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अजमेर येथून अटक केली आहे
शिर्डीचा ठकसेन भूपेंद्र पाटील साळवे याने शेअर ट्रेडिंग कंपनीच्या नावाखाली परताव्याचे मोठे आमिष दाखवून सुरुवातीला गुंतवणूक करत गुंतवणूकदारांना ठरल्याप्रमाणे परतावा दिला व विश्वास संपादन केला. मात्र नंतर परतावा देणे बंद केले होते राज्यातून अनेक गुंतवणूकाधारकांचे करोडो रुपये गुंतवणूक गोळा करत तो फरार झाला आहे.
भूपेंद्र पाटील साळवे यांच्यावर शहादा येथे गुन्हा दाखल झाला आहे. राज्यामध्ये ठिकठिकाणी अश्या बोगस शेअर ट्रेडिंग कंपनीच्या नावाने मोठी आमिषे दाखवून गुंतवणूक करून फसवणूक करणाऱ्या संचालकांना पोलीस विविध ठिकाणाहून पकडून आणत आहेत.भूपेंद्र पाटील करोडो रुपये घेऊन फरार झाला आहे
.व त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र ह्या पोलिसांना तो सापडत कसा नाही? की प्रशासन त्यावर मेहरबान आहे. ह्या माळमाथ्यावर दैनिक साईदर्शनाने वृत्त प्रकाशित केले होते ह्या भुप्याला ताब्यात घेऊन शिर्डीत आणून त्याची मालमत्ता त्याचे बँकिंग अकाउंट स्टेटस सर्व तपासून ते सील करणे गरजेचे आहे.
नाहीतर भूपेंद्र पाटील याचे वेळ काढूपणाचे धोरण हे अंगलट येऊ शकते व तो परदेशात फरार होऊ शकतो. अशी शक्यता वर्तवली होती त्याचा कुठेही थांगपत्ता लागत नव्हता परंतु नंदुरबारच्या स्थानिक शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने ह्या ठकसेन भुप्यास अजमेर येथून मोठ्या शिताफने अटक करून रात्री उशिरा शहादा येथे आणले आहे
त्यास आज कोर्टात हजर करून पोलीस कष्टडी घेणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे त्यासोबतच ह्या भोप्याला मदत करणारे त्याचे वडील चुलते भाऊ यांच्यावरही गुन्हे दाखल करून त्यांनाही अटक व्हावी म्हणून काही गुंतवणूकदार गुन्हे दाखल करणार असल्याचीही खात्रीशीर माहिती आलेली आहे