
शिर्डी प्रतिनिधी शिर्डीच्या ठकसेन भूपेंद्र साळवे पाटील याच्यावर सर्व प्रथम शहादा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी सौ. साक्षी जगदीश मानकर राहणार साईबाबा मंदिर जवळ शहादा जिल्हा नंदुरबार यांनी दिनांक २०/०५/२०२५ रोजी ह्या ठकसेनावर गुन्हा दाखल केल्याने एकाच खळबळ उडाली आहे
ह्या ठकसेनाने संपूर्ण महाराष्ट्रासह अनेक परराज्यातून शेकडो करोडो रुपये जमा करून राज्यातून पलायन केले आणि मिळालेल्या माहिती नुसार त्याचा पासपोर्ट देखील तय्यार झालेला आहे आणि तो देश सोडून जाणार असल्याची चर्चा सुरु झालेली आहे
ह्या ठकसेनाने व त्याला मदत करणाऱ्या लोकांवर देखील लवकरच गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता आहे काही गुंतवणूक धारकांनी आपले काष्टाचे पैशे बुडीत जाणार असल्याच्या भीतीने आत्महत्या करण्याचे प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे सर्व प्रथम शहादा येथे गुन्हा दाखल झाल्याने शिर्डी येथेही शिर्डी पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल होण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आलेले असल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे
अनेक गुंतवणूक धारकांनी घरावर कर्ज काढलेत अनेकांनी बँकेतून सोसायटीतून कर्ज काढलेत काहींनी घरातले सोने तारण ठेऊन आणि विकून व आपली आविष्याची जमापुंजी ह्या ठकसेन चालवीत असलेल्या ग्रो मोअर शेयर कंपनीत गुंतवलेले आहेत आणि त्यांची पैशे मिळण्याची आशा मावळात चाललेली आहे
कारण कि दिलेल्या मुदतीत ह्या ठकसेनाने पैशे परत दिले नाहीत आणि त्याचे मोबाईल सुद्धा बंद आहे तो कोणाच्याही संपर्कात येण्यास तय्यार नाही करोडो रुपये घेऊन फरार झालेल्या ह्या ठकसेन आणि त्याच्या साथीदारांवर लवकरच शिर्डीत देखील गुन्हा दाखल होणार आहे