शिर्डी (प्रतिनिधी) अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब गोविंद काळे यांनी चोरीचे सोने घेतो म्हणून अटक करू,या सोन्याच्या रिकव्हरी ऐवजी 70 हजार पटकन आणून दे, असे म्हणून रिकव्हरी च्या नावाने माझ्या भावाला गुन्ह्यात अटक होऊ नये म्हणून तेथील थोरात साहेबांच्या नावाच्या प्रभावाचा बेकायदेशीर वापर करून माझ्याकडे 70 हजार रुपयाची लाचेची मागणी करून लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवली
अशी आशयाची फिर्याद अहिल्यानगर येथील अक्षय सुनील मिसाळ यांनी अहिल्यानगर येथील पोलीस स्टेशनला केली आहे. यासंदर्भात सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,
अक्षय सुनील मिसाळ( वय 30 वर्षों, धंदा सोनार, राहणार झारेकर गल्ली ता. जि. अहिल्यानगर यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे की,
मी सराफाचा व्यवसाय करतो. माझा लहान भाऊ नामे आकाश सुनिल मिसाळ हा देखिल सराफ व्यवसाय करतो, मी माझ्या दुकानावर टाकळी काजी, ता. नगर येथे असताना नाझा भाऊ आकाश सुनिल मिसाळ यांनी मला फोन करून सांगितले की, मला एल.सी.बी. येथील पोलीसांनी ताब्यात घेवुन पोलीस अधीक्षक कार्यालय, अहिल्यानगर येथे आणले आहे व ते मला म्हणाले की, तु चोरीचे सोने विकत घेतलेले आहे त्यामुळे तुला येथे आणले आहे.
असे ऐकल्यावर मी लागलीच डी एस पी चौकात असलेल्या एल सी बी च्या आफिसला गेलो, तेथे गेल्यावर मला काळे पोलीस भेटले. मी त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी सांगतिले की, आमच्या कार्यालयात चोरीच्या गुन्हयासंदभनि तपास चालू आहे, तो तपास थोरात साहेबांकडे आहे.
तुझा भाऊ आकाश याने त्या चोरीच्या गुन्हयातील आरोपीकडून चोरीचे सोने विकत घेतले आहे, त्याला गुन्हयात अडकू दयायचे नसेल तर काहीतरी पैशांची तडजोड करावी लागेल. काळे पोलीस असे बोलल्यावर मला समजले की ते माझेकडे लाचेची मागणी करत आहेत. कारण, दि.30/04/2024 रोजी मला व माझ्या वडिलांना देखील एल.सी.बी. येथील पोलीसांनी ताब्यात घेवुन सांगितले होते की,
तुम्ही चोरीचे सोने घेतले आहे, तुम्हाला गुन्हयात अटक होवू दयायची नसेल तर तुम्ही आम्हाला तीन लाख रूपये दया तरच तुम्हाला सोडुन देबु, नाहीतर तुम्हाला चोरीचे सोने घेतले म्हणुन अटक करू अशी धमकी दिली. त्यावेळी माझा भाऊ आकाश मिसाळ यास एल. सी. बी कार्यालय येथे बोलावुन मी त्याला माहिती सांगितली. त्यावेळी माझ्या भावाने भीती पोटी एल.सी.बी. पोलीसांना तीन लाख रूपये दिले होते.
त्यावेळी एल.सी. बी पोलीस यांनी मला व माझ्या वडीलांना सोडुन दिले होते, आता सुध्दा माझ्याकडुन पैशांची मागणी होईल परंतु मला यावेळी लाच देण्याची ईच्छा नसल्याने मी चौकशी करून लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय, अहिल्यानगर येथील पोलीस निरीक्षक छाया देवरे यांच्याशी फोनद्वारे संपर्क करून माझी लाचेचे संदर्भाने तक्रार असलेबाबत सांगितले असता त्यांनी मला अहिल्यानगर येथिल सुरक्षित ठिकाणी बोलावून घेतले,
मी पोहचल्यावर देवरे मॅडम यांनी तेथे उपस्थित असलेल्या दोन शासकिय पंच, पोकों/ सुदुक यांची व नाझी आपआपसात ओळख करून देवून सर्वासमक्ष माझी तोंडी तक्रार ऐकून घेतली. त्यानंतर लेखी तक्रार लिहून घेवून त्यावर मी, देवरे मॅडम व दोन पंचांनी सहया केल्या, देवरे मॅडम यांनी काळे पोलीस आमचेकडे लाचेची मागणी करतात अगर कसे याबाबत पडताळणी करायची असलेने मला व पंचाना सुचना देवून व्हाईस रेकॉर्डर चालु करून देवुन तो माझ्या ताब्यात दिला.
त्यानंतर मी पंच क्र. 1 यांच्यासह एल सी बी कार्यालय, अहिल्यानगर येथे गेलो. त्याठिकाणी मला काळे पोलीस भेटले त्यांनी मला माझ्या भावाने चोरीचे सोने घेतले आहे त्याची रिकव्हरी दयावी लागेल असे सांगितले. आमचे बोलणे सुरू असताना त्या ठिकाणी थोरात साहेब आले. त्यांना मी मिटवुन घेण्याची विनंती केली त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे सांगितले.
त्यानंतर थोरात साहेबांना काहीतरी काम आल्याने ते त्या ठिकाणावरून दुसरीकडे निघुन गेले. त्यानंतर काळे पोलीस माझ्याकडुन एक तोळा सोन्याच्या रिकव्हरी बद्दल विचारत होते. मी त्यांना आम्ही सोने घेतले नाही तर आम्ही रिकव्हरी कशी देणारे असे म्हटले, त्यानंतर त्यांनी सोन्याच्या रिकव्हरी ऐवजी सत्तर पटकन आणुन दया,
असे म्हणून रिकव्हरीच्या नावाने माझ्या भावाला गुन्हयात अटक होवू नये म्हणून थोरात साहेबांच्या नावाच्या प्रभावाचा बेकायदेशिर वापर करून माझ्याकडे 70,000/- रूपये लाचेची मागणी केली. व लाचेची रक्कम लवकर घेवून येण्याबाबत सांगितले. त्यानंतर मी व पंच 1 असे लाचलुचपत कार्यालय, अहिल्यानगर येथे आलो, तेथे माझे व्हॉईस रेकॉर्डर मशीन बंद करून व्हॉईस रेकॉर्डरमध्ये रेकॉर्ड झालेले संभाषण डी वाय एस पी
लोखंडे साहेब व पोलीस निरीक्षक देवरे मॅडम यांनी ऐकले.
एलसीबीचे काळे पोलीस यांनी माझ्याकडे लावेथी मागणी केली असल्याबाबत सर्वांना खात्री झाली. त्यांनंतर मला व पंचांना सापळा कारवाई विषयी सुचना दिल्या. दरम्यान काळे पोलीस यांचा फोन आला असता त्यांनी मला व्हाटसअप कॉल कर असे सांगून पैसे कधी आणतो मी पैसे घेण्यासाठी थांबलो आहे
असा तगादा लावत 2-3 व्हॉटसअप कॉल केले. मी पैशांची जमवाजमव करत आहे असे सांगून मी त्यांच्याकडून वेळ मागून घेतला. सदरचे फोनवरील संभाषण देखील व्हॉईस रेकॉर्डरमध्ये रेकॉर्ड करण्यात आले. नी काळे पोलीस यांना लाच म्हणुन देण्यात येणा-या 500/- रूपये दराच्या 100 चलनी नोटा असे एकूण 50,000/- रूपये हजर केले. त्या नोटाना अन्थ्रासिन पावडर लावून माझेकडे देण्यात आले.
नवीन मेमरी कार्ड टाकून व्हॉईस रेकॉर्डर माझे गळ्यात अडकवून पंच 1 सह सापळा कारवाईसाठी मला एल सी बी कार्यालय अहिल्यानगर येथे रवाना केले, आमचे पाठोपाठ पोनि श्रीमती देवरे मॅडम व सापळा पथक आले. आम्ही एसपी ऑफिसमध्ये गेलो असता त्या इमारतीच्या खाली उभ्या असलेल्या पोलीसांनी आम्हाला वरच्या मजल्यावर असलेल्या एल सी बी च्या कार्यालयात जावू दिले नाही.
मी काळे पोलीस यांना फोन केला असता त्यांनी देखिल माझा फोन घेतला नाही. त्यांना माझा काहीतरी संशय आला असावा अशी माझी खात्री झाल्याने मी व पंच 1 असे लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय, अहिल्यानगर येथे परत आलो, त्यानंतर पोनि छाया देवरे यांनी लोकसेवक काळे पोलीस यांनी संपर्क केल्यार त्वरीत संपर्क साधण्यास तसेच मला गोपनीयतेच्या सुचना देवुन जाण्यास मोकळीक दिली.
त्यानंतर दि. 13/06/2024 रोजी मी ला.प्र.वि कार्यालय, अहिल्यानगर येथे पोनि छाया देवरे यांची भेट घेवुन त्यांना कळविले की, दि.09/05/2024 रोजी लाच मागणी पडताळणी करवाई दरम्यान लोकसेवक काळे पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी सोन्याच्या रिकव्हरी ऐवजी सत्तर पटकन आणुन दया, असे म्हणून रिकव्हरीच्या नावाने माझ्या भावाला गुन्हयात अटक होवू नये म्हणून थोरात साहेबांच्या नावाच्या प्रभावाचा बेकायदेशिर वापर करून माझ्याकडे 70,000/- रूपये लाचेची मागणी केली आहे.
तसेच त्या नंतर आयोजित सापळा कारवाई दरम्यान लोकसेवक काळे यांना माझा काहीतरी संशय आला असल्यामुळे त्यांनी माझा फोन उचलला नाही व माझ्या भावाला देखील सोडून दिले. तसेच आज पावेतो माझ्याशी संपर्क केला नाही त्यामुळे लोकसेवक काळे यांनी मागणी केलेली लाच रक्कम भविष्यात माझेकडुन स्विकारणार नाही.
करिता सदरची कारवाई पुर्णतः स्थगित करण्यात यावी व आज पावेतो झालेल्या कार्यवाहीवरुन लोकसेवक काळे, पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचे विरुध्द पुढील कारवाई करण्यात यावी बाबतचा सविस्तर जबाब दिला. सदर बाबत पोनि छाया देवरे यांनी गोपनियता बाळगण्याबाबत सुचना दिल्या.
तरी लोकसेवक भाऊसाहेब गोविंद काळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी दि. 09/05/2024 रोजी 19.08 ते 20.01 वा. चे स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय, अहिल्यानगर येथे लाच मागणी पडताळणी कारवाई च्या वेळी पंच नं.1 यांचेसमक्ष लोकसेवक काळे पोलोस, स्थानिक गुन्हे शाखा,
अहिल्यानगर यांनी सोन्याच्या रिकव्हरी ऐवजी सत्तर पटकन आणुन दया, असे म्हणून रिकव्हरीच्या नावाने माझ्या भावाला गुन्हयात अटक होवू नये म्हणून थोरात साहेबांच्या नावाच्या प्रभावाचा बेकायदेशिर वापर करून माझ्याकडे 70,000/- रूपये लाचेची मागणी करून लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली
म्हणुन माझी लोकसेवक भाऊसाहेब गोविंद काळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, तत्कालीन नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर, सध्या नेमणुक- एम.आय.डी.सी, पोलीस स्टेशन, अहिल्यानगर यांचे विरूध्द फिर्याद दिली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.