
शिर्डी ( प्रतिनिधी) कोपरगावचे मुख्याधिकारी यांनी ठोस निर्णय घेऊन खाजगी जागेत बांधलेले अनधिकृत अतिक्रमित इमारतीतील मजला उध्वस्त केला. तसा निर्णय शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी घेणार का ?
कोपरगाव मध्ये कोपरगाव नगरपरिषदेचे धडाकेबाज मुख्याधिकारी यांनी अनधिकृत बांधकाम हटवण्यास सुरुवात केली आहे. कोपरगाव येथील खाजगी जागेत एका अनधिकृत असलेला इमारतीतील मजलाही त्यांनी काढला आहे. मात्र शिर्डीत गोरगरिबांची अतिक्रमणे घरे घरकुले टपऱ्या काढल्या जात आहेत मात्र मोठ-मोठे हॉटेल, रेस्टॉरंट यांच्या इमारतीत अनधिकृत मजले चढवण्यात आलेले आहेत.
हे अतिक्रमण मात्र नगरपरिषद काढण्यास दुर्लक्ष करीत आहेत. कारण ही अतिक्रमणे मोठमोठ्या प्रतिष्ठित व्यक्तींची असल्यामुळे व त्यांचे वजन असल्यामुळे नगर परिषदेचे मुख्याधिकारी ते काढण्यास धाडस करीत नाहीत असे दिसून येत आहे. अनेकदा तक्रारी करूनही येथील हॉटेल साई स्पर्श मिनी पंजाब रेस्टोरंटचे अनधिकृत केलेले अतिक्रमण नगरपरिषदेने काढले नाहीत.
अशा अतिक्रमण धारक हॉटेलवाल्यांना नगरपरिषद एक प्रकारे आधार देत आहेत . त्यामागे काय गौड बंगाल आहे, हे समजत नसून कोपरगाव प्रमाणे शिर्डी नगर परिषदेने ही आता गोरगरिबांच्या झोपड्या टपऱ्या काढल्या तसेच हॉटेल साई स्पर्श मिनी पंजाब रेस्टोरंटचे अनधिकृत केलेले अतिक्रमण नगरपरिषदेने काढावे अन्यथा तक्रार करणारे अर्जदार आमरण उपोषणाला ठाम आहे.