
शिर्डी प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्याची काही पोलिसांनी प्रतिमा मालिन करून टाकली असल्याचे काही दिवसांपासून घडत असलेल्या घटनांवरून दिसून येत आहे काही दिवसांपूर्वी अहमदनगरचे नूतन खासदार निलेश लंके यांनी अहमदनगर जिल्ह्याच्या पोलिसांचा भ्रष्टाचाराचा पाढा वाचून ४ दिवस उपोषण केले होते
त्याची दखल पोलीस महानिरीक्षकांनी घेतली असल्याचे सांगण्यात आले होते आणि १५ दिवसात ह्या पोलिसांची चौकशी करू असे लेखी पत्र दिल्याने खासदार निलेश लंके यांनी आपले उपोषण सोडले होते पोलीस महानिरीक्षकांनी दिलेल्या आश्वासनांचे पुढे काय झाले हे अजूनही गुलदस्त्यातच आहे
निलेश लंके यांनी शेकडो पुरावे त्यावेळी सादर केले होते तरीही कारवाई झाली नाही याचा अर्थ पोलीस यंत्रणा किती सक्षम आहे यावरून स्पष्ट दिसुन येते भ्रष्टाचार व लाच घेणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारींवर आरोप करण्यात आले होते
त्यांच्यावर कुठलीही कारवाई न झाल्याने त्यांनी पुन्हा डोके व काढण्यास सुरुवात केलेली आहे यातील मुख्य आरोप असणारे पोलीस नाईक रवींद्र कर्डीले (कलेक्टर) याने पुन्हा यंत्रणा हातात घेतली असल्याचे बोलले जात आहे
याने ह्याकमाईतून करोडो रुपयांची प्रॉपर्टी कमावलेली असल्याची चर्चा आहे त्याची बदली फक्त कागदोपत्रीच होते त्याची बदली झाल्यानंतर सुद्धा त्याने पुन्हा दोन नंबर धंदे वाल्यांकडे आपले लक्ष केंद्रित केलेले असल्याची चर्चा सुरु झालेली आहे ह्या कर्मचारीही शिर्डी येथे नियुक्ती असतांना तो अहमदनगर येथेच कार्यरत होता
त्यावर वरिष्ठ मेहेरबान असल्याचे बोलले जात आहे हा कर्मचारी एकदा पैशे घेतांना यांच्या लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात सुद्धा अटकला होता तो पुन्हा सक्रिय झाला असल्याची चर्चेने दोन नंबर धंदेवाल्यांनी धसका घेतला असल्याची चर्चा आहे