Letest News
दाल में कुछ काला नहीं… पूरी दाल ही काली दिख रही है! दया साई संगम डिलक्स हॉटेलच्या चोरीत कुछ तो गडबड ... वडिलांची प्रकृती गंभीर तरी १५०० भाविकांची जबाबदारी खांद्यावर! ‘मंत्रीपद सेवेचे, गुंडगिरीचे नाही!’ मंत्र्यांनी मुलाला आवर घालावा- डॉ. राजेंद्र पिपाडांचा इशारा साफसफाई करताना सापडले ६.५ ग्रॅमचे सोन्याचे गंठण- साई कर्मचाऱ्याने प्रामाणिकपणे केले संस्थानकडे जमा!र... ‘गोविंदा रे गोपाळा’च्या गजराने दुमदुमणार शिर्डी साई समाधी मंदिरात दोन दिवस विविध कार्यक्रम रील बनवा… टॅलेंट दाखवा… अन् जिंका तब्बल ५५५५ रुपयांचे प्रथम पारितोषिक!विकास गोंदकर पा. मित्र मंडळ व ... नियोजित शिर्डी-नाशिक रेल्वेमार्गासाठी निमगाव-कोऱ्हाळे परिसरातील जमिनी जाणार शेतकऱ्यांनी वेळीच हरकती ... “मराठ्यांना मूर्खात काढू नका!” जरांगेंचा विखेंवर थेट बॉम्बगोळा—‘सगळ्यात चालबाज डाव तुमचाच दिसतोय!’ स्मशानभूमीच्या पाठीमागे रंगला ‘तिरट’चा डाव शिर्डी पोलिसांची धडक कारवाई ७ जुगारी ताब्यात शिर्डीत नोकरीला असलेल्या डॉक्टरच्या भरधाव फॉर्च्युनरची धडक निष्काळजीपणामुळे दोघांचा मृत्यू!
राजकीयशिर्डी

साफसफाई करताना सापडले ६.५ ग्रॅमचे सोन्याचे गंठण- साई कर्मचाऱ्याने प्रामाणिकपणे केले संस्थानकडे जमा!रासने यांनी सोन्यापेक्षा मोठी गोष्ट जपली—प्रामाणिकपणा!

शिर्डी : श्री साईबाबा संस्थानच्या मंदिर परिसरात साफसफाईचे काम करत असताना आरोग्य विभागातील कर्मचारी सखाहारी कोंडीराम रासने यांना सोन्याचे गंठण आढळून आले. तब्बल ६.५ ग्रॅम वजनाचे आणि अंदाजे ९५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण हातात आल्यानंतरही कोणत्याही प्रकारचा मोह न ठेवता रासने यांनी ते तात्काळ संस्थानच्या संरक्षण कार्यालयात जमा करून आपल्या प्रामाणिकपणाचा आदर्श निर्माण केला.
मंदिर परिसरात साफसफाईचे काम सुरू असताना रासने यांना हे सोन्याचे गंठण आढळले. सापडलेली मौल्यवान वस्तू स्वतःकडे न ठेवता त्यांनी तत्काळ संस्थानच्या संबंधित विभागाकडे सुपूर्द केली. त्यानंतर गंठणाचे वजन करण्यात आले असता ते ६.५ ग्रॅम भरले असून, त्याची अंदाजे किंमत ९५ हजार रुपये असल्याचे स्पष्ट झाले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाची किंमत मोठी!
आजच्या काळात हजारो रुपयांचे सोने सापडल्यानंतर ते परत करण्याची मानसिकता प्रत्येकाकडे असेलच असे नाही. मात्र, साईबाबांच्या मंदिरात सेवा बजावणाऱ्या सखाहारी रासने यांनी दाखविलेला प्रामाणिकपणा निश्चितच कौतुकास्पद ठरला आहे. आपल्या हातात आलेली मौल्यवान वस्तू क्षणाचाही विलंब न करता संस्थानकडे जमा करून त्यांनी ‘सेवा हीच साईसेवा’ या भावनेचे दर्शन घडविले.
रासने यांच्या या प्रामाणिकपणाचे श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. गोरक्ष गाडीलकर तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. भीमराज दराडे यांनी विशेष कौतुक केले.


‘साईबाबा हरवलेले परत करतात’ या श्रद्धेला मिळाले बळ
श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक शिर्डीत येतात. या पवित्र मंदिर परिसरात एखाद्या भाविकाची मौल्यवान वस्तू हरवली आणि ती संस्थानच्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून सुरक्षितपणे परत मिळाली, की भाविकांच्या मनातील साईबाबांवरील श्रद्धा आणखी दृढ होते.
‘साईबाबा आपले हरवलेले परत करतात’ हा भक्तांचा विश्वास अशा घटनांमुळे अधिक बळकट होत आहे. संस्थानच्या कर्मचाऱ्यांकडून वेळोवेळी दिसून येणारा प्रामाणिकपणा, सेवाभाव आणि कर्तव्यनिष्ठा हीच श्री साईबाबांच्या शिकवणीची खरी अनुभूती असल्याची भावना यानिमित्ताने व्यक्त होत आहे.
सोन्याचे गंठण मिळाले, पण रासने यांनी सोन्यापेक्षा मोठी गोष्ट जपली—प्रामाणिकपणा!

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button