Letest News
राहाता तालुक्यातील एकरूखे येथे सरकारी वकिलाच्या घरी धाडसी दरोडा- १.५१ लाखांचा ऐवज लुटून चार दरोडेखोर... साईबाबांवर हात ठेवून शपथ घ्या- टक्केवारी कोणी मागितली?निलेश लंके यांचा विखेंवर घणाघात मंदिर परिसरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाटइशारा देऊनही संस्थान-नगरपरिषद सुस्त अखेर साईभक्त महिलेवर कु... पती बेपत्ता म्हणून पत्नीची पोलिसांत तक्रार शोध घेताना समोर आला धक्कादायक प्रकार! पत्नीच्या नावाने रू... पैशांसाठी विवाहितेचा छळ चारित्र्यावर संशय घेत मारहाण‘गाडी घेण्यासाठी माहेरून पैसे आण नाहीतर जिवंत सो... ओबीसी मोर्चाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुखपदी बाळासाहेब गाडेकर शिर्डीत साईबाबांच्या धुपारतीच्या वेळेत बदल श्रावण सोमवारी सायंकाळी ६ वाजताच धुपारती चक्क भरदिवसा किराणा दुकानाचा गल्ला साफ! दान करायला आले अन् सोन्याची पोत घेऊन पसार!शिर्डीत महिलेची हातचलाखीने फसवणूक ४० हजारांचे सोने लंपास NH-160 च्या निकृष्ट कामावर पिपाडांचा हल्लाबोल!ठेकेदार सल्लागार एजन्सी व दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाख...
अ.नगरक्राईम

राहाता तालुक्यातील एकरूखे येथे सरकारी वकिलाच्या घरी धाडसी दरोडा- १.५१ लाखांचा ऐवज लुटून चार दरोडेखोर पसार!

राहाता : बाळाला उलटी झाली आहे, पाणी पाहिजे, अशी बतावणी करून घरात प्रवेश करणाऱ्या चार अनोळखी दरोडेखोरांनी सरकारी वकिलाच्या पत्नीला चाकूचा धाक दाखवत घरातील तब्बल १ लाख ५१ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटल्याची धक्कादायक घटना राहाता तालुक्यातील एकरूखे येथे घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, एकट्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
श्रद्धा गौरव बोर्डे (वय ३८, रा. एकरूखे, ता. राहाता) या घरी एकट्या असताना शनिवार, दि. २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ७.२० वाजता दोन मोटारसायकलींवरून चार अनोळखी व्यक्ती त्यांच्या घरासमोर आले. त्यापैकी सुमारे ५५ वर्षांचा एक इसम पांढरा पायजमा, नेहरू शर्ट, गांधी टोपी व कपाळावर टिळा अशा वेशात होता. त्याने घराचे गेट उघडून आत प्रवेश केला आणि “बाळाला उलटी झाली आहे, मला पाणी पाहिजे,” असे सांगितले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


बोर्डे यांनी पाणी आणून दरवाज्याची जाळी उघडताच त्या इसमाने अचानक चाकूचा धाक दाखवून घरात जबरदस्तीने प्रवेश केला. त्याने धमकावत त्यांच्या अंगावरील दागिने काढून घेतले. कानातील टॉप्स ओढून घेतल्याने त्यांच्या कानाला, गळ्याला व गालाला दुखापत झाली. दरम्यान, त्याच्या अन्य तीन साथीदारांनी घरातील बेडरूममध्ये प्रवेश करून सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम लुटली.
दरोडेखोरांनी जाताना “याबाबत कोणाला काही सांगितले तर तुला जिवंत मारून टाकू,” अशी जीवे मारण्याची धमकी दिली आणि दोन मोटारसायकलींवरून पसार झाले.
लुटलेल्या ऐवजात ७ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, २ ग्रॅम वजनाचे दोन सोन्याचे ओमपान, ४ ग्रॅम वजनाचा सोन्याचा वेल, २ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ५ ग्रॅम वजनाचे कानातील टॉप्स, चांदीच्या तोरड्या आणि विविध दराच्या नोटांसह रोख रक्कम असा एकूण १ लाख ५१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.


या प्रकरणी श्रद्धा बोर्डे यांच्या फिर्यादीवरून राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ३४२/२०२६ अन्वये बी.एन.एस. कलम ३०९(६), ३३१(४), ३५१(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली राहाता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. पोलीस हेड कॉन्स्टेबल जी. डी. गडाख व सहाय्यक पोलीस निरीक्षक संगिता गिरी तपासात सहभागी आहेत. चारही आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून, त्यांच्या हालचाली व घटनास्थळावरील पुराव्यांच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button