शिर्डी | प्रतिनिधी :
भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान नेते तथा शिर्डीचे बाळासाहेब काशिनाथ गाडेकर यांची भाजप ओबीसी मोर्चाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर यांनी गाडेकर यांच्या कामाची दखल घेत ही महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे.
बाळासाहेब गाडेकर यांनी पक्षाच्या माध्यमातून विविध सामाजिक व संघटनात्मक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे उत्तर महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळ मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यांच्या निवडीचे शिर्डीसह उत्तर महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात येत आहे.

गाडेकर यांच्या नियुक्तीबद्दल विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, आमदार विवेक कोल्हे, वैभव पिचड, राजेंद्र गोंदकर, शिवाजी गोंदकर, सचिन तांबे, नितीन कापसे, सचिन शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
‘संघटन मजबूत करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार’
निवडीनंतर बाळासाहेब गाडेकर म्हणाले, “पक्षाने माझ्यावर सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत कार्यकर्त्यांना संघटित करून पक्षाची ताकद अधिक वाढविण्यासाठी काम करणार आहे.”
गाडेकर यांच्या नियुक्तीमुळे उत्तर महाराष्ट्रातील ओबीसी समाजात तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी काळात ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून संघटनात्मक विस्तार आणि समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी गाडेकर यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.