Letest News
गुटख्याच्या काळ्या बाजाराला एलसीबीचा दणका! तिघांना न्यायालयात हजर करताच एक दिवसाची पोलीस कोठडी पुरवठ... डॉ. सुजय विखेंचा मेंदू खराब झाला’- रोहित पवारांचा बोचरा पलटवार उदयपूर ते शिर्डी सातवी पदयात्रा भक्तिभावात पूर्ण- साईभक्त मोहित आचार्य यांचे शिर्डीत आगमन गुटखा तस्करांवर एलसीबीची वक्रदृष्टी शिर्डीत एकाच रात्री तीन गुन्हे दाखल! दैनिक साईदर्शनच्या पाठपुराव... साई निर्माण ग्रुपच्या संकल्पपूर्ती तीर्थयात्रेचा भक्तिमय सोहळा- साई निर्माण ग्रुप व विजयराव कोते यां... पोटची मुलगी गमावली-अनाथ मुलीला घेतले दत्तक… अर्धी संपत्ती तिच्या नावे! अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वा... सुमन काळे कोठडी मृत्यूप्रकरणाची फाईल पुन्हा उघडणार!१९ वर्षांच्या न्यायसंघर्षाला नवी दिशा तलाठी भरतीतील भ्रष्टाचारावर रोहित पवारांचा विखेंवर थेट हल्लाबोल ‘राजीनामा आधी द्या-मग पवारांवर बोला!... शिर्डी संस्थानमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात गोरक्ष गाडीलकरांच्या हस्ते ध्वजारोहण राष्ट्रीय महामार्गांवरील अतिक्रमणांवर आता बुलडोझर ६० दिवसांत कारवाईचे आदेश
क्राईमशिर्डी

गुटख्याच्या काळ्या बाजाराला एलसीबीचा दणका! तिघांना न्यायालयात हजर करताच एक दिवसाची पोलीस कोठडी पुरवठादारांचा शोध सुरू

तिघांना न्यायालयात हजर केले; एक दिवसाची पोलीस कोठडी
एलसीबीने केलेल्या तीन स्वतंत्र कारवायांमध्ये प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केल्यानंतर तिन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. संबंधित आरोपींविरुद्ध कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना रविवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
या वेळी पोलिसांनी न्यायालयात आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा मुद्देमाल, कारवाईची पार्श्वभूमी आणि गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या तपासाची माहिती सादर केली. तसेच हा माल नेमका कुठून आणण्यात आला, त्याचा पुरवठा कोण करीत आहे, शिर्डी परिसरातील आणखी कोणकोणत्या ठिकाणी प्रतिबंधित गुटख्याची विक्री अथवा साठवणूक केली जाते, याचा तपास करणे आवश्यक असल्याने आरोपींची पोलीस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


या कारवाईमागील पुरवठा साखळीचा तपास, मालाचा स्रोत, वितरण करणारे व्यक्ती आणि या अवैध व्यवसायात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत माहिती मिळविण्यासाठी पोलिसांना आरोपींची कोठडी आवश्यक असल्याचा युक्तिवाद करण्यात आला.
पोलिसांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने तिन्ही आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी (पीसी) सुनावली.
त्यामुळे आता या एक दिवसाच्या पोलीस कोठडीत आरोपींकडून मिळणाऱ्या माहितीतून गुटखा पुरवठ्याचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचतात, याकडे लक्ष लागले आहे. विशेषतः शिर्डीत प्रतिबंधित गुटख्याचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा कोण करतो आणि या व्यवसायामागे आणखी कोण व्यक्ती आहेत का, याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
एलसीबीच्या सलग तीन कारवायांनंतर आता केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई न करता प्रतिबंधित गुटख्याच्या मूळ पुरवठादारापर्यंत पोहोचण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

तपास हेड कॉन्स्टेबल लांडे व
हेड कॉन्स्टेबल चव्हाण हे करीत आहेत

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button