Letest News
अबब! साई संस्थान हादरले — संस्थानमधील ४७ कर्मचाऱ्यांनी साईबाबांच्या झोडीत हात घातला”“शेवटी साईबाबांच... पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपट टीमचे श्री साईबाबा समाधी दर्शन शिवमहापुराण कथा –पोलिसांचे नियोजन फळास गर्दीचा फायदा घेणाऱ्या टोळ्यांवर धडक कारवाई-२६ आरोपींना अटक मिश्राला साईबाबांची एलर्जी महाराष्ट्र हि साईंची शिवांची आणि संतांची भूमी साईबाबा हे आमचे देवचं नाहीत... रेखा जरे हत्याकांडात मोठी घटना! — बाळबोठे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर कोपरगाव – करंजी शाळेत दाखले वाटप; नायब तहसीलदार सातपुते यांच्या उपस्थितीत उपक्रमाची प्रशंसा साईभक्त जितेंद्र उमेडी यांनी श्री साईबाबांच्या चरणी तांब्याची छत्री केली अर्पण आजचा दिवस शिर्डीकरांसह संपूर्ण साईभक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि भावनिक —श्री साईबाबा महासमाधी दिन गुन्हे प्रतिबंध आणि पुढील योजना-ऑपरेशन मुस्कान – पार्ट 2 : शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागृती अभियान निवडणूक आयोग हरिश्चंद्र नाही' उद्धव संतापले -मतदार यादी दुरुस्त करा- नंतरच निवडणुका राज ठाकरे-मतदार ...
अ.नगर

झाडांचा ८ वा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा….

राहाता येथील साईयोग फाउंडेशन द्वारे गेली आठ वर्षांपासून वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन केलेल्या झाडांचा वाढदिवस प्रांताधिकारी माणिक आहेर,गट विकास अधिकारी जालिंदर पटारे,समाज प्रबोधनकार भाऊ थोरात,मुख्याधिकारी वैभव लोंढे, माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ,राहाता प्रेस क्लबचे अध्यक्ष रामभाऊ लोंढे,सर्जेराव मते,प्रदीप बनसोडे,भानुदास गाडेकर,संदीप डांगे,शारदा विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद तोरणे,योगगुरू सुरेश भिंगारदीवे,अरुण मोकळ आदी मान्यवरांच्या उपस्थितीत धूमधडाक्यात साजरा करण्यात आला.याप्रसंगी मान्यवरांचा साईयोग फाउंडेशन द्वारे फेटा बांधून साईशाल देवून सत्कार करण्यात आला.या झाडांना त्रिरंगी रंगांचा पट्टा मारून रांगोळी काढून फुगे बांधून सजविण्यात आले होते.महिला सदस्यांच्या हस्ते वृक्षांचे औक्षण करून पूजन करण्यात आले.तसेच चिमुकल्यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.वृक्षांची सजावट व तेथे लावलेले फ्लेक्स सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


साईयोग फाऊंडेशनचे जेष्ठ सदस्य रविंद्र धस यांनी सर्वांचे स्वागत करत प्रस्तावना केली.बाळासाहेब गाडेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तसेच ह्या परिसरातील कदंबाची सर्व झाडे वृक्षदाते कै.अमोल जोशी (वाकडीकर) यांनी दिल्याचे नमूद करत त्याचे स्मरण केले.प्रमुख अतिथी भाऊ थोरात यांनी आपले परखड विचार मांडताना समाजातील अनिष्ट रूढी परंपरांवर आसूड ओढत आपल्या विशेष शैलीत अप्रतिम समाजप्रबोधन केले.प्रांताधिकारी माणिक आहेर यांनी साईयोग फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचा उल्लेख योग प्राणायाम,स्वच्छता अभियान,वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन हे समर्पित भावनेने केलेचे प्रतिक आहे.तसेच प्राणायामाद्वारे श्वास कसा घ्यावा हे शिकवताना श्र्वासासाठी प्राणवायू निर्मितीसाठी वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाचे महान कार्य हे फाउंडेशन करत असल्याचा उल्लेख करत ह्या कार्याला व्यापक स्वरूप येण्यासाठी सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.मुख्याधिकारी वैभव लोंढे,पत्रकार रामभाऊ लोंढे, कैलास सदाफळ,सर्जेराव मते,प्रमोद तोरणे,अरुण मोकळ आदी मान्यवरांनी फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.शेवटी फाऊंडेशनचे जेष्ठ सदस्य सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे यांनी सर्वांचे आभार मानले.


यावेळी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करण्यात मोलाचे सहकार्य करणारे मनोज पिपाडा,प्रभाकर नावकर व साई योग फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष डॉ बापूसाहेब पानगव्हाणे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.


याप्रसंगी पत्रकार राजुभाई पठाण,माजी उपनगराध्यक्ष संजय सदाफळ,माजी नगरसेवक विजय सदाफळ,ॲड अमोल डांगे,मुन्ना सदाफळ,मुन्नाभाई शहा,रावसाहेब गाढवे,डॉ रवींद्र घोगरे,डॉ मनोज कुलकर्णी,डॉ प्रकाश आदक,अशोक पवार,प्रविण डुंगरवाल,भारत दवंगे,गोरख दंडवते,दत्तात्रय धनवटे,विलास वाळेकर,भाऊसाहेब बनकर,संजय बाबर,व्यंकटेश अहिरे,पांडुरंग गायकवाड,दीपक दंडवते,डॉ संजय उबाळे,राजेंद्र फंड,अनिल सातव,राजेंद्र वायकर,पंढरीनाथ काकडे,प्रताप गमे,जितेंद्र अहिरे,रमेश दंडवते,प्रदीप सदाफळ,किरण राऊत,अरविंद बावके,प्रकाश पुंड,विष्णू गाडेकर,मिलिंद बनकर,राजेंद्र बांगर,बबलू फटांगरे,संजय वाघमारे,उमेश लुटे,दास कुंभकर्ण,केतन कुंभकर्ण,कैलास चेनुके,अण्णासाहेब कांदळकर,सिताराम बावके,प्रकाश बेंद्रे,बाळासाहेब तारगे,आप्पासाहेब माळवदे,शिवाजी पोटे,संतोष बावके,अतुल बोठे,अनिल पावटे,दीपक गाडेकर,नारायण गाडेकर,अनिल पवार,सुनील गायकवाड,विनय गिरी,सुरेश गाडेकर,सागर माळवे,सचिन बनकर,गोरख कदम,सुभाष डांगे,बाळासाहेब गुंजाळ,भानुदास जायभाय,प्रभाकर डांगे,माजी नगरसेविका अनुराधा तुपे,डॉ अंजली पानगव्हाणे,आशा पिपाडा,सुष्मिता चव्हाण,उज्वला गाडेकर,नीलम चेनुके,माधुरी माळवे,वैष्णवी पिपाडा सार्थक तुपे,अर्जुन चव्हाण,प्रणव लावर,अशोक साठे,सलमान शेख,संजय गोयर,देविदास वैराळ,नाना दिवे आदी मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button