आठवड्यातील मोहिमेची थोडक्यात माहिती
राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चोरीच्या वाहने आणि विना नंबर प्लेट दुचाकी गाड्या वापरल्या जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर २३/०९/२०२५ ते ३०/०९/२०२५ दरम्यान विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत २३२ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. एकुण वसूल झालेला दंड १,३०,२००/- रुपये इतका आहे.
२. कारवाईची दिवसानुसार तफावत
२३/०९/२५ – ३८ केसेस, ₹२०,०००
२४/०९/२५ – ३५ केसेस, ₹१८,५००
२५/०९/२५ – ४० केसेस, ₹२४,०००
२६/०९/२५ – ३६ केसेस, ₹१९,७००
२७/०९/२५ – १४ केसेस, ₹७,५००
२८/०९/२५ – ११ केसेस, ₹८,५००
२९/०९/२५ – ३७ केसेस, ₹२०,५००
३०/०९/२५ – २१ केसेस, ₹११,५००
३. नागरिकांसाठी सूचना
सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांवर पुढील व मागील नंबर प्लेट व्यवस्थित बसवाव्या.
नंबर प्लेट नसल्यास विनाकारण दंड भरण्याची वेळ येईल.
पालकांनी अल्पवयीन मुलांना वाहन चालवू देऊ नयेत; आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
चोरीचे वाहन शोधणे सोपे व्हावे यासाठी नागरिकांनी आपली वाहने योग्य प्रकारे नोंदणी करून ठेवावी.
४. मोहिमेचे नेतृत्व आणि मार्गदर्शन
सदर मोहिमेचे नेतृत्व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केले, तर मार्गदर्शन पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री देवदत्त भवर यांनी केले.
पथकामध्ये पोसई संप्तर्षीं, सफौ. आव्हाड, पोहे, दरेकर, ठोंबरे, पो. हे. काँ. फुलमाळी आणि होमगार्ड कर्मचारी सहभागी होते.
नवीन वाहनांवर नंबर प्लेट न लागल्यास शोरूमला आरटीओ द्वारे पत्र पाठवून कारवाई केली जाईल.