
अहिल्यानगर –
मा. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील अवैध कत्तलखान्यांवर धडक कारवाई सुरू आहे. स्थानिक गुन्हे शाखेने १४ गोवंशीय जनावरांची सुटका केली आणि ८०० किलो गोमांस जप्त केले आहे. या कारवाईमुळे गोवंश तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
🚔 पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार तयार विशेष पथक
स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि समीर अभंग, दिपक मेढे, अंमलदार सुनिल पवार, भिमराज खर्से, रिचर्ड गायकवाड, राहुल डोके, पो.का जालिंदर माने, मांडगे, पो.का खैरे, पो.का मालणकर, पो.का जाधव, पो.का खेडकर, चालक भगवान धुळे, चालक कुसळकर, बाळासाहेब नागरगोजे, तसेच महिला अंमलदार भाग्यश्री भिटे व ज्योती शिंदे यांच्या पथकाने गोवंश तस्करांविरुद्ध गुप्त कारवाई सुरू केली होती.
🐄 ममदापूर येथे छापा – आरोपी पसार, मोठा मुद्देमाल जप्त
दिनांक ९ ऑक्टोबर रोजी लोणी पोलीस ठाणे हद्दीतील ममदापूर येथे पथकाने छापा टाकला असता, गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी आणल्याचे आढळून आले. पोलीस पाहताच मुश्ताक कुरेशी, आदिल कुरेशी, अब्दुल करिम कुरेशी, शाहिद युनुस कुरेशी आणि साजीद युनुस कुरेशी हे आरोपी पसार झाले.
सदर ठिकाणावरून ₹१२ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, ज्यामध्ये १४ जिवंत जनावरे, स्विफ्ट कार (MH 02 AP 2921) आणि ८०० किलो गोमांस समाविष्ट आहे.
⚖️ नागरिकांची मागणी – शिर्डीतही धडक कारवाई व्हावी!
या घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, गोवंश तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यात सामील आरोपींवर “महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का)” अंतर्गत कठोर कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
शिर्डीतही अनेक ठिकाणी अवैध गोमांस विक्री होत असल्याचे नागरिक आणि सामाजिक संघटना सांगत आहेत. श्रीरामपूरमधील कारवाईप्रमाणे शिर्डीतही सर्व मेडिकल/कत्तली तपासून तस्करांविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी जनतेची मागणी आहे.
सदर प्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात गु.क्र. ५५०/२०२५ नोंदवण्यात आला असून, पुढील तपास सोनई पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.
ही कारवाई मा. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.