Letest News
दहीहंडी फोडून श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता! रक्षाबंधनाच्या पवित्र नात्याला काळिमा नीच चैतन्य पाटीलच्या कृत्याचा काळा महिमा!! इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली मानसिक छळाचा ससेमिरा; दोघांवर गंभीर गुन्हा! शिर्डीत साईभक्त महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन ओरबाडल्याची धक्कादायक घटना समोर आली शासकीय विश्रामगृहात व्हिआयपी!व्हिव्हिआयपी तथा मंत्रीगण येतात!! थंड पेय तथा चहा! कॉफी पंचपक्वाने सोबत... राहात्यात सोशल मीडियावर बदनामीचा धडाका सहा जण पोलिसांच्या रडारवर! मंत्र्याचा मुलगा राजकुमार शिर्डी परिसरात पोलीस वाहनांच्या ताफ्यात फिरण्यावरून राजेंद्र पिपाडांचा घणा... नागपूरच्या साईभक्ताकडून ४ लाख ५६ हजार रुपयांचा सोन्याचा आकर्षक ओम ब्रोच श्री साईचरणी अर्पण अॅड. गौरव लोकचंदानीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! NMIMSमध्ये अॅड. गौरव लोचंदानींचा विशेष सन्मान जय महाकाली मित्र मंडळाची नवरात्रोत्सवाच्या नियोजनासाठी आज बैठक
क्राईमशिर्डी

भुप्या पाटीलला नंदुरबारच्या पोलिसांनी आणले शिर्डीत  चौकशी करीत प्रॉपर्टी केली सील 

शिर्डी येथील ग्रोमोर नावाची  कंपनी असल्याचे  बोगस भासवून गोर गरिबांना लुटणारा ठकसेन भुप्या पाटील सह त्याचा बाप. चुलता भाऊ आणि इतर दोघांवर शहादा. राहाता व शिर्डी पोलीस स्टेशनला ठेवीदारांनी त्यांची फसवणूक झाल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे सध्या तो नंदुरबार एल सी बी च्या  ताब्यात आहे

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

त्याला अधिक चौकशी साठी काल शिर्डीला आणले होते त्यावेळी त्यास त्याच्या राहात्या घरी घेऊन जाऊन चौकाशी करण्यात आली त्याने कुठं कुठं प्रॉपर्टी घेतली आहे याचीही कसून चौकशी करण्यात आली त्याची प्रॉपर्टी सील करण्यात आलेली आहे  त्याच्या चेहेऱ्याकडे पाहून असे वाटत होते कि त्याला अटक झाल्यानंतरही काहीच फरक पडलेले नाही

यावरूनच कळत तो किती शातीर लुटारू आहे त्यास गोपनिय पद्धतीने शिर्डीत आणले आणि चौकशी करून पुंन्हा नंदुरबार येथे घेऊन गेले व उर्वरित आरोपी हे आजूनही मोकाट फिरत आहेत नंदुरबारच्या एल सी बी ने त्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यास अजमेर हुन अटक करून आणली आणि आपल्या अहिल्यानगर येथील एल सी बी ला उर्वरित आरोपी सापडत नाहीत

ह्यामुळे गुंतवणूक धारकांमध्ये संशय निर्माण होऊ लागला आहे ह्या विषयी बोलतांना प्रथम नगराध्यक्ष कैलास कोते यांनी सांगितले कि आहिल्यानगर पोलिसांनी यातील उर्वरित आरोपींना अटक करून शिर्डीत आणले पाहिजे त्यांच्या कडून चौकशी केली पाहिजे

जी रक्कम घेऊन तो फरार झाला त्या रकमेची विल्हेवाट कुठे लावली याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे
भूपेंद्र आणि त्याच्या सहकार्यांवर राहाता व शिर्डी येथे गुन्हा दाखल असल्याने त्यास लवकरच दोन्ही पोलीस स्टेशनं ताब्यात घेणार आहेत


भुप्या पाटीलला काल नंदुरबारच्या पोलिसांनी आणले शिर्डीत चौकशी करीत प्रॉपर्टी केली सील नंदुरबार एल सी बी ह्या आरोपीला अजमेर येथून अटक करतात मग अहिल्यानगर एल सी बी उर्वरित आरोपीना का अटक करीत नाही गुंतवणूक धारकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरु आहे

  अहिल्यानगर पोलिसांनी उर्वरित आरोपीना त्वरित अटक करून पैश्यांची विल्हेवाट कुठं लावली याची माहिती घेऊन गोर गरिबांचे पैशे प्रत मिळण्यासाठी प्रयत्न करावे  एका वर्षात पैसे दुप्पट आणि मासिक परताव्यावर चकाचक कमाईचे आमिष दाखवत ‘ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट फायनान्स’ या बनावट आर्थिक कंपनीने राज्यभरातील हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

या कंपनीविरोधात शिर्डी आणि राहाता पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांचा तपास पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशाने येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button