Letest News
वटपौर्णिमेनिमित्त महिलांनी सुरक्षिततेची घ्यावी विशेष काळजी-शिर्डी पोलिसांचे आवाहन शिवसेना उद्धव गटाचे रावसाहेब खेवरे अखेर शिंदे शिवसेनेत दाखल उद्धव ठाकरेंना राजकीय धक्का शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिर्डी दौऱ्याच्या पार्श्वभ... आधी ओळख मग मैत्री त्यानंतर योगेशचा त्या महिले सोबत ताथा थैया -हा गुन्हा खोटा की खरा चर्चांना उधाण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर
Blog

चंपाषष्ठी निमित्त शिर्डीच्या श्री खंडोबा मंदिरात सकाळपासून अभिषेक पूजासह विविध होत आहेत धार्मिक कार्यक्रम!

शिर्डी( प्रतिनिधी) शिर्डी येथील प्रसिद्ध अशा श्री खंडोबा मंदिरात श्री मार्तंड म्हाळसापती महाराज ट्रस्टच्या वतीने दरवर्षीप्रमाणे बुधवार दिनांक 13 डिसेंबर ते मंगळवार दिनांक 19 डिसेंबर या कालावधीत श्री चंपाषष्ठी उत्सव साजरा केला जात असून दररोज विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहे. चंपाषष्ठी निमित्त भाविकांनी येथे दर्शनासाठी मोठी गर्दी केली असून विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न होत आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


आओ साई म्हणत म्हाळसापती याच मंदिरात श्री साईबाबांना हाक मारली .तेव्हापासूनच साईबाबा हे नाव पडले. अशा प्रसिद्ध श्री खंडोबा मंदिरात चंपाषष्ठी उत्सव दरवर्षी साजरा होतो‌ यावर्षी तो साजरा होत असून आज चंपाषष्ठीच्या मुख्य दिवशी सोमवारी 18 डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता अभिषेक पूजा करण्यात आली. सकाळी सात ते अकरा वाजता श्री मल्हारी महात्म पारायण व तळी भंडारा चा कार्यक्रम संपन्न झाला. दुपारी बारा वाजता मध्यान आरती व नैवेद्य पूजा संपन्न झाली. त्यानंतर दुपारी एक ते तीन या वाजे दरम्यान अन्नदान भंडाऱ्याचा कार्यक्रम संपन्न झाला. आज चंपाषष्ठी निमित्त शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी येथे भेट देऊन श्री खंडेरायाचे दर्शन घेतले.

kamlakar

त्यांच्यासोबत शिंदे गटाचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते हे उपस्थित होते. त्यांचा येथील ट्रस्टच्या वतीने शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. रात्री नऊ ते दहा या वेळेत श्री साई भक्त श्री म्हाळसापती भगत व श्री खंडोबा महाराज यांच्या प्रतिमेची श्री साईंच्या समाधी मंदिरात भेट व दर्शन नंतर श्री खंडोबा मंदिराकडे प्रस्थान होणार आहे आणि त्यानंतर रात्री अकरा वाजता वाघ्या मुरळीचे देव जागरण व कथा कार्यक्रम होणार आहे.
तर सांगता दिनी मंगळवारी 19 डिसेंबर रोजी पहाटे तीन वाजता अग्निकुंड होम शुभारंभ होणार असून दिवसभर येथे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहे. अशी माहिती संदीप मनोहर नागरे, अजय मनोहर नागरे यांनी दिली आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button