
शिर्डी प्रतिनिधी
दिनांक २५/०१/२०२४ रोजी मी नागपूर येथे उपोषणाला जाऊ नये म्हणून तत्कालीन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या सांगण्यावरून तत्कालीन पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी माझे परवाना असलेले शस्त्र ६ ते ७ पोलिसांनी मला धरून बळजबरीने बेकायदेशीर काढून घेतले होते.
तसा ह्या घटनेचा त्याच दिवशी पंचनामाही केला होता माझे शस्त्र जमा केल्यानंतर माझी आणि पंचांची व दिनेश आहेर यांची कागदावर सही करून ते कागद शस्त्रावर चिटकवून माझे शस्त्र सील करण्यात आले होते.
त्या सर्व काडतुसांवर के. एफ. ३२s &w.l असे लिहिलेले होते पंचनामा करतांना मात्र ५ काडतूस के. एफ. ३२s &w.l असे असलेले दाखवले आणि एक काडतूस geco ३२s &w.l असे लिहिलेले आहे. माझे शस्त्र मला परत करण्याचे आदेश मा. जिल्हाधिकारी सो आहिल्यानगर यांनी दिनांक ०४/०८/२०२५ रोजी पोलीस अधीक्षक यांना दिले होते.
यात पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडले आणि पोलीस अधीक्षक सो यांनी तात्काळ माझे शस्त्र परत देण्याचे लेखी आदेश भिंगार पोलीस स्टेशनला दिल्याने मी माझे शस्त्र घेण्यास भिंगार पोलीस स्टेशनला गेलो होतो
त्याठिकाणी कर्तव्यावर असणारे पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल राठोड यांनी स्टेशन डायरीत नोंद घेतली वास्तविक पाहता जसे शस्त्र जमा करतांना पंचनामा केला होता तसाच पंचनामा शस्त्र देतान्ना केला पाहिजे होता तसे न करता मला शस्त्र परत दिले आणि मी भिंगार पोलीस स्टेशनं कडून शस्त्र ताब्यात घेतांना त्याची सर्व व्हिडीओ शूटिंग केलेली आहे.
तेथील विठ्ठल राठोड दादांनी कपाटातुन शस्त्र काढून माझ्या कडे दिले असता माझे शस्त्र हे एका खाकी कागदात गुंडाळलेले होते आणि वरून दोऱ्याने बांधलेले होते.
ते मी तेथे उपस्तिथ असलेल्या विठ्ठल राठोड दादांसमोर खोलत असतांना तो दोरा जास्त कडक असल्याने तो दोरा विठ्ठल राठोड दादांनी कैचीने कापला त्यानंतर मी ते खाकी कागद उघडले असता त्याच्या आत पुन्हा कोरा पांढरा पेपर होता त्यात माझे शस्त्र होते जसे माझे शस्त्र पॅकिंग होते अश्याच प्रकारे पॅकिंग केलेले सहा काडतूस होते.
काडतूस आणी शस्त्रावर जे खाकी व पांढरा कागद होता त्यावर मी आणि पंच व दिनेश आहेर यांनी सही करून सील केलेला कागद होता तो कागद ह्या खाकी पेपर वर नव्हता आणि माझे शस्त्राचे लॉकची पट्टीही नव्हती आणि एक राउंड जो पंचनाम्यात उल्लेख केलेला आहे geco ३२s &w.l तो मुळातच माझा नव्हता
त्या काडतुसावर २ वेळेस स्टिगर चालवल्याचे निशाण आहेत याचा अर्थ असा आहे कि पंचनामा केल्यानंतर माझे शस्त्र पुन्हा खोलण्यात आलेले आहे आणि दिनेश आहेर यांनी काहीतरी खोडसारपणा करून माझ्या शस्त्राचे लॉक काढून टाकण्यात आलेले आहे.
आणि काडतुसाची अदलाबदल करण्यात आली असल्याची मला खात्री झालेली आहे याचे महत्वाचे कारण असे आहे कि ते शस्त्र माझ्यासमोर पंचांसमोर पंचनामा करून माझी व पंचांची व दिनेश आहेर यांची सही केलेला कागद चिटकवून सील करण्यात आलेले होते आणि ते शस्त्र मी परत घेतांना त्यावर आम्ही केलेल्या सहीचा कागद नव्हता फक्त दोऱ्याने खाकी व पांढऱ्या कागदात गुंडाळलेला होता.
त्यावरून माझी खात्री झालेली आहे कि माझ्या शस्त्राचा व काडतुसांचा गैरवापर करून त्याचे लॉक तोडून आणि काडतुसाची अदलाबदली करण्यात आली आहे माझ्या शास्त्राचा कुठेतरी गैर वापर करण्यात आलेला आहे आणि माझे एक काडतुसाचाही गैर वापर करून मला कुठल्यातरी गुन्ह्यात गोवण्याचा प्रयत्न केला गेला आहे याची सखोल चौकशी होऊन गुन्हे अन्वेषण विभागाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक दिनेश यांच्यावर कारवाई व्हावी.
व माझे १ जिवंत काडतूस मला भेटावे व मला दिलेले geco ३२s &w.l ह्यानंबरचे काडतूस पोलीस प्रशासनाने आपल्या ताब्यात जमा करावे व माझे शस्त्राचा लॉक बसवून मिळावा तसेच माझे शस्त्र जमा केल्यानंतर त्याचे काहीही गैर वापर झालेले असल्यास त्याची संपूर्ण जवाबदारी हि माझे शस्त्र जमा करणाऱ्या दिनेश आहेर यांची राहील.
म्हणून याची सखोल चौकशी होऊन गुन्हे अन्वेषण विभागाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक दिनेश यांच्यावरमाझ्या शस्त्राचे गैरवापर केल्या प्रकरणी गुन्हा दाखल व्हावा नाहीतर मला 197 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची परवानगी मिळावी असा आशयाचा अर्ज पोलीस महासंचालक,

विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक, मुख्यमंत्री, गृहमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पालकमंत्री, अप्पर पोलीस अधीक्षक, पोलीस उपविभागीय अधिकारी, भिंगार पोलीस स्टेशन तशेच शिर्डी पोलीस स्टेशनला जितेश लोकचंदानी यांनी अर्ज दिला आहे आहे