Letest News
शिर्डीत मध्यरात्री संशयास्पद हालचाली दुचाकीसह दोघे पोलिसांच्या जाळ्यात! संकटात साई संस्थान ठरले आधारवड!कर्मचाऱ्यास अपघात विम्यापोटी साडेतीन लाखांची मदत पर्युषण महापर्वानिमित्त जिल्ह्यातील कत्तलखाने मांस विक्री केंद्रे बंद जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया य... चाकूचा धाक दाखवून तरुणीला घेऊन पसार! भावाला लाथाबुक्क्यांनी मारहाण रोशन घेगडमलसह दोघांविरुद्ध तक्रार प्रवीणभाऊ आल्हाट यांची मानवाधिकार असोसिएशनच्या अहिल्यानगर उत्तर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती थरावर थर… कौशल्याचा कहर! शिर्डीत सनमित्र-क्रांतीच्या दहीहंडीचा पुन्हा एकदा जल्लोष अहिल्यानगरचा डाग पुसण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची धडपड शिर्डीतील काही पोलिसांमुळे प्रयत्नांना तिलांजल... ड्रेनेजची तक्रार केली म्हणून महिलेवर हात उचलला! लाथाबुक्क्यांनी मारहाण दगडाने डोके फोडले ‘कुटुंबाला... शिर्डीत भक्तिमय वातावरणात श्री गोकुळाष्टमी उत्सव उत्साहात अनाथ बालकांसोबत ‘दबंग’ अधिकाऱ्याचा वाढदिवस!कायदा-सुव्यवस्थेत कणखर भूमिका सामाजिक जाणीवेतही तितकीच सं...
क्राईम

मंदिरातील पूजाऱ्यांनी महिलेला भांग देऊन अत्याचार करून केली निर्घृण हत्या

ठाणे : मंदिरात आलेल्या एका तरुणीला मंदिरातील पूजाऱ्यांनी भांग दिला आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. यावर पुजारी थांबला नाही, तर त्या तरुणीची त्याने निर्घृण हत्याही केली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिासांनी एका पुजाऱ्याला अटक केली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

काय आहे नेमकी घटना?
घरगुती भांडण झाल्याने एक विवाहित तरुणी डायघर जवळील शीळ फाटा गणेश घोळ या मंदिरात मनःशांतीसाठी आली होती. मंदिराचे मुख्य पुजारी बालक महाराज उत्तर प्रदेश इथं आपल्या गावी गेल्याने काही दिवस गणेश घोळ यांनी मंदिर सांभाळण्यासाठी श्यामसुंदर शर्मा, संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे या तीन पुजाऱ्यांना गावाहून बोलावून घेतलं होतं. पीडित महिला ही बेलापूर इथं राहाणारी आहे. घरात कौटुंबिक वाद सुरु असल्याने ती 6 जुलैला ती शिळ फाटा रोडवरच्या गणेश घोळ मंदिरात सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास आली.

दिवसभर ही महिला त्याच मंदिरात बसल्याने मंदिरातील पुजाऱ्यांनी तिला दुपारचे जेवण दिलं. त्यानंतर संध्याकाळचा चहा देताना या चहा मध्ये भांगेची गोळी मिसळून दिली. चहा प्यायला नंतर महिलेची शुद्ध हरपली. त्यानंतर रात्रभर ही महिला या मंदिरातच होती. रात्रीच्या वेळी मंदिरातील श्यामसुंदर शर्मा, संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे या तीन पुजाऱ्यांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. पहाटे शुद्ध आल्यानंतर या महिलेच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली.

महिलेची निर्घृण हत्या
महिला आरडाओरडा करत असल्याने आपलं बिंग फुटेल या भितीने पुजाऱ्यांनी तिला मारहाण करत जमिनीवर आपटलं, यातच त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर महिलेचा मृतदेह त्यांनी मंदिराच्या बाजूला असलेल्या जंगलात फेकून दिला. दोन दिवसांनी मंदिरात गेलेल्या एका भाविकाला डोंगरावर जंगलात पडलेला महिलेचा मृतदेह दिसला. त्याने याची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत तपास सुरु केला. परिसरातील सीसीटीव्ही तपासल्यानंतर पोलिसांना गणेश घोळ मंदिरातील पुजाऱ्याचा संशय आला. पुजाऱ्यांना चौकशी केली असता त्यांनी या घटनेची कबुली दिली. पोलिसांनी संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे या दोघांना अटक केली.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button