Letest News
ड्रेनेजची तक्रार केली म्हणून महिलेवर हात उचलला! लाथाबुक्क्यांनी मारहाण दगडाने डोके फोडले ‘कुटुंबाला... शिर्डीत भक्तिमय वातावरणात श्री गोकुळाष्टमी उत्सव उत्साहात अनाथ बालकांसोबत ‘दबंग’ अधिकाऱ्याचा वाढदिवस!कायदा-सुव्यवस्थेत कणखर भूमिका सामाजिक जाणीवेतही तितकीच सं... मध्यस्थीची भावना जुनी आधुनिक स्वरूप अधिक परिणामकारक! — न्या. शिवाजी कचरे प्रमुख जिल्हा व सत्र न्याया... कडक शिस्तीच्या अधिकाऱ्याला सर्वपक्षीय सलाम! अमोल मोरे यांची प्रांताधिकारीपदी पदोन्नती सापडलेला लाखाचा मोबाईल साईभक्ताला परत संस्थान कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाला सलाम! निर्व्यसनी तरुणाईची एकजूट ढोल-ताशांच्या गजरात रंगणार गोविंदांचा जल्लोष शिर्डीच्या साईदरबारी भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा गोकुळाष्टमीनिमित्त साईचरणी सोन्याचा ब्रोच अर्पण भगवान थोरात यांची ग्राहक संरक्षण समितीच्या राहाता तालुका प्रवक्तेपदी नियुक्ती
क्राईमशिर्डी

कल्पना खरातचा अटकपूर्व जामिनासाठी धाव- 10 एप्रिलला राहता न्यायालयात सुनावणी

शिर्डी/राहता : भोंदू अशोक उर्फ ‘कॅप्टन’ खरात प्रकरणात आता मोठी घडामोड समोर आली आहे. त्याची पत्नी कल्पना खरात हिने अटक टाळण्यासाठी थेट न्यायालयाचे दार ठोठावले असून, अटकपूर्व जामिनासाठी राहता न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर 10 एप्रिल रोजी सुनावणी होणार असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे.
💣 जमीन घोटाळा आणि फसवणुकीचे सावट शिर्डी येथील जमीन व्यवहारात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार आणि फसवणूक झाल्याचा आरोप समोर आल्यानंतर शिर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आता कल्पना खरात यांचे नाव पुढे येत असल्याने तपास अधिकच गंभीर बनला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

🕵️‍♂️ कॅप्टन खरातच्या जाळ्याचा विस्तार? अशोक खरात प्रकरण आधीच महिलांच्या शोषण आणि आर्थिक गैरव्यवहारामुळे गाजत असताना, आता जमीन घोटाळ्याची भर पडल्याने हे प्रकरण बहुपेडी रॅकेट असल्याची शक्यता बळावली आहे.
या प्रकरणात आणखी कोणाची नावे समोर येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
🔥 10 एप्रिल निर्णायक! — जामीन मिळणार की कारवाई? राहता न्यायालयातील सुनावणीत कल्पना खरात यांना दिलासा मिळणार की पोलिसांचा पिंजरा घट्ट होणार?
👉 10 एप्रिल हा दिवस या प्रकरणात मोठा टर्निंग पॉइंट ठरण्याची शक्यता!
👉 एकंदरीत, भोंदू अशोक खरातच्या साम्राज्याचे एकेक थर उघड होत असून, आता कुटुंबीयांवरही कायद्याची टांगती तलवार दिसत आहे. “भोंदूगिरीपासून जमीन घोटाळ्यापर्यंत” — प्रकरण दिवसेंदिवस अधिकच भयानक होत चाललं आहे!

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button