Letest News
दहीहंडी फोडून श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता! रक्षाबंधनाच्या पवित्र नात्याला काळिमा नीच चैतन्य पाटीलच्या कृत्याचा काळा महिमा!! इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली मानसिक छळाचा ससेमिरा; दोघांवर गंभीर गुन्हा! शिर्डीत साईभक्त महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन ओरबाडल्याची धक्कादायक घटना समोर आली शासकीय विश्रामगृहात व्हिआयपी!व्हिव्हिआयपी तथा मंत्रीगण येतात!! थंड पेय तथा चहा! कॉफी पंचपक्वाने सोबत... राहात्यात सोशल मीडियावर बदनामीचा धडाका सहा जण पोलिसांच्या रडारवर! मंत्र्याचा मुलगा राजकुमार शिर्डी परिसरात पोलीस वाहनांच्या ताफ्यात फिरण्यावरून राजेंद्र पिपाडांचा घणा... नागपूरच्या साईभक्ताकडून ४ लाख ५६ हजार रुपयांचा सोन्याचा आकर्षक ओम ब्रोच श्री साईचरणी अर्पण अॅड. गौरव लोकचंदानीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! NMIMSमध्ये अॅड. गौरव लोचंदानींचा विशेष सन्मान जय महाकाली मित्र मंडळाची नवरात्रोत्सवाच्या नियोजनासाठी आज बैठक
राजकीयशिर्डी

मतभेद संपले_विकासाला सुरुवात- एकजुटीतून प्रभागाचा नवा अध्याय- सुजित गोंदकर यांच्याकडून सतिष उर्फ नंदूभाऊ गोंदकर यांचा जाहीर सत्कार

शिर्डी | प्रतिनिधी
शिर्डी शहरातील प्रभाग क्रमांक २ हा केवळ एक राजकीय प्रभाग नसून, तो सामाजिक बांधिलकी, परस्पर विश्वास आणि सुसंस्कृत राजकारणाची परंपरा जपणारा प्रभाग म्हणून ओळखला जातो. नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीनंतर या प्रभागात जे दृश्य पाहायला मिळालं, ते संपूर्ण शिर्डीसाठी प्रेरणादायी ठरावं असंच आहे.
निवडणुकीत विजयी झालेले सतिष उर्फ नंदूभाऊ गोंदकर यांचा सुजित गोंदकर यांनी आपल्या मित्रपरिवारासह जाहीर सत्कार करत, राजकारण म्हणजे संघर्ष नव्हे, तर समाजसेवा ही भूमिका ठामपणे मांडली. निवडणूक काळात मतभेद झाले असले, तरी निकालानंतर ते बाजूला ठेवत लोकहिताला प्राधान्य देणं हीच खरी राजकीय परिपक्वता असल्याचं यावेळी अधोरेखित करण्यात आलं.
सत्कारप्रसंगी बोलताना सुजित गोंदकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं,
“प्रभाग हा माझा परिवार आहे. प्रभागातील प्रत्येक नागरिक हा माझ्या कुटुंबातील सदस्य आहे. त्यामुळे विजयी उमेदवारांनी हाती घेतलेल्या प्रत्येक विकासकामात मी भक्कमपणे सोबत राहणार आहे. राजकारण येतं-जातं, पण माणुसकी आणि विकास कायम असतो.”
या शब्दांनी उपस्थित नागरिक, कार्यकर्ते आणि ज्येष्ठांमध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. निवडणूक संपल्यानंतरही सहकार्याची, संवादाची आणि सामंजस्याची भूमिका घेतल्यामुळे प्रभाग क्रमांक २ मध्ये आगामी काळात विकासकामांना वेग मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे.
यावेळी उपस्थित मित्रपरिवार, स्थानिक कार्यकर्ते व नागरिकांनीही एकजुटीचा संकल्प व्यक्त केला. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, नागरी सुविधा, ज्येष्ठ नागरिक व युवकांसाठी उपक्रम अशा विविध प्रश्नांवर सामूहिक प्रयत्नांतून काम करण्याचा निर्धार करण्यात आला.
या संपूर्ण घटनेमुळे शिर्डीच्या सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा पुन्हा एकदा उजळून निघाला असून, प्रभाग क्रमांक २ हा भविष्यातही एक आदर्श प्रभाग म्हणून ओळखला जाईल, यात शंका नाही.
— साईदर्शन न्यूज | SD News

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button