Letest News
“दैवी शक्ती”च्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण! अशोक खरात प्रकरणात SITचा स्फोटक खुलासा लोणी पोलिसांच्या तपासाला मोठे यश! उर्वरित बोगस डॉक्टरांना कधी अटक होणार?” ⚠️ साई मंदिर परिसरातील भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करा-अन्यथा प्रशासन जबाबदार!” 🚨 “द्वारकामाईत साईभक्त अक्षरशः घामाघूम- राजेंद्र कोते पाटील यांची संस्थान प्रशासनाला भावनिक साद” राहात्यात पोलिसांचा धाक संपला? गुन्हेगार मोकाट-नगराध्यक्षांचा संताप शिर्डीत ‘MOBILEWALA’ चे दिमाखदार आगमन मोबाईल व होम अप्लायन्सेसच्या विश्वात नवा अध्याय सुरू आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी साई संस्थानचा मोठा आधार; मोफत निवासी CET कोचिंगची घोषणा शिर्डीत पर्यटकांच्या गाड्यांवर चोरट्यांचा डल्ला साईभक्ताची बॅग-मोबाईल आणि रोख रक्कम लंपास पोलीस असल्याची बतावणी-प्रेमसंबंधांचे आमिष अन् शिर्डीत अत्याचार? नांदगाव प्रकरणाने खळबळ “डेथ नेटवर्क”चा फैलाव? राहाता तालुक्यात गर्भलिंग रॅकेटची भीषण साखळी उघड होण्याची चिन्हे
अ.नगरराजकीय

स्वतंत्र विमान पाठवणं पडणार महागात निवडणूक आयोग

नाशिक जिल्ह्यातील विधानसभेच्या तीन जागांसाठी खास विमानाने आलेल्या ‘एबी फॉर्म’ची वार्ता सर्वदूर पसरल्यानंतर निवडणूक आयोगानेही त्याची दखल घेतली आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश आयोगाकडून जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात एअर ट्रॅफिक कंट्रोल रूमकडे विचारणा केल्याची प्राथमिक माहिती आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून, जिल्ह्यात पक्षांतर्गत बंडखोरीसह मैत्रीपूर्ण लढतीचा नवा अध्याय सुरू झाला आहे. अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी शेवटच्या अर्ध्या तासात ‘एबी फॉर्म’बाबत नाट्यमय घडामोडी घडल्या. देवळाली आणि दिंडोरीतील प्रत्येकी एका उमेदवारासाठी खास विमानाने ‘एबी फॉर्म’ पाठविण्यात आले. अंतिम काही मिनिटांत ते दाखल झाल्याने उमेदवारीवर अधिकृत शिक्कामोर्तब झाले.

या धावपळीमध्ये इगतपुरीसाठीही एक ‘एबी फॉर्म’ दहा मिनिटे उशिराने आल्याने तो दाखल होऊ शकला नाही. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणूक आयोगाने त्याची दखल घेऊन जिल्हा निवडणूक शाखेला त्याबाबत विचारणा केली आहे. अर्ज देण्यासाठी विमान कोणी आणले, त्यामध्ये कोण होते,

कोणत्या उमेदवारांकरिता हे फॉर्म मागविण्यात आले व त्यासाठी किती खर्च आला, अशी विचारणा स्थानिक प्रशासनाकडे झाल्याचे समजते. जिल्हा प्रशासनाने या चौकशीला सुरुवात केली असून, एअर ट्रॅफिक कंट्रोल विभागाकडे त्याबाबत विचारणा केली आहे. याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button