
शिर्डी येथे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोखंडे यांनी साईबाबांच्या समाधीवर शाल टाकून एकनाथ शिंदेंची अशीच भरभराटी होवो हि साईबाबांचरणी प्रार्थना केली आणि शिर्डी येथे घडलेल्या हत्याकांडाचे निषेध करून आरोपींचा एन्काऊंटर व्हावा

अशी प्रशासनाकडे मागणी करून ह्याबाबत आपण स्वताहा पक्षप्रमुख एकनाथ शिंदेंना भेटून पाठपुराणावा करणार असल्याचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी सांगितले ह्यावेळी शिवसेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख कमलाकर कोते उपस्तिथ होते मा खासदार यांनी सांगितले कि शिर्डी सारख्या पावनभूमीत अश्या प्रकारे गुन्हेगारी वाढणे हि शरमेची बाब आहे
पोलिसांनी ह्याकडे दुर्लक्ष केल्याने येथे गुन्हेगारी वाढली आहे यात जे पोलीस अधिकारी कर्मचारी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि शिर्डीची गुन्हेगारी संपूर्णपने नष्ट करावी तसेच दुहेरी हत्याकांडात मयत झालेल्या दोघांच्या कुटुंबातील सदस्यांना संस्थान मध्ये कायम करून घ्यावे
मयत्तांच्या कुटुंबियांना शासनाने १० १० लाख रुपये द्यावेत यासाठी आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रा फडनवीस उपमुख्यमंत्री व पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून पाठपुरावा करणार आहे शिर्डीत होत असलेल्या ग्रामसभेलाही त्यांनी समर्थन दर्शविले