Letest News
साईबाबांविरोधातील वक्तव्यावर गौतम खट्टर नमले-राहाता न्यायालयात चूक मान्य-यापुढे आक्षेपार्ह भाष्य करण... घरासमोरच उघडपणे सुरू होता लाखोंच्या उलाढालीचा जुगार अड्डा-स्थानिक गुन्हे शाखेच्या धाडीत रोख रक्कम-मो... दिव्यांगावर दहशत! मारहाण-शिवीगाळ-मोबाईलची तोडफोड- सचिन भैरवकर आरोपीवर गंभीर गुन्हा दाखल सावळी विहीरच्या दूध संकलन केंद्रावर एफडीएची धडक कारवाई-परवाना तात्काळ निलंबित साईबाबा रुग्णालयातील स्टाफ नर्स विरुद्ध ७.९० लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा शिर्डीत ५५ सभासदांच्या मालमत्तेवर न्यायालयाचा 'ब्रेक' २७.९८ लाखांच्या थकबाकीप्रकरणी विक्री-हस्तांतरण... शिर्डी विविध कार्यकारी सोसायटीचे १ हजार मेट्रिक टन क्षमतेचे अन्नसुरक्षा भांडारचे काम प्रगतीपथावर शिर्डीत ३२ व्या श्री साईसच्चरित पारायण सोहळ्याची तयारी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात शिर्डीत १५ वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या श्रीरामनगर परिसर हादरला साईदर्शनासाठी आलेल्या चार वर्षीय चिमुकलीचा शिर्डीत भीषण अपघातात मृत्यू-साईनगरी हळहळली
राजकीयशिर्डी

शिंदे लोकसभा निवडणुकीनंतर राजकारणातच राहणार नाहीत संजय राऊत

आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी साईबाबांचं दर्शन घेतलं. त्यावेळी त्यांच्यासह संजय राऊतही होते. साईबाबांवर आमची श्रद्धा आहे. असं संजय राऊत म्हणाले. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर संजय राऊत यांनी टीका केली आहे.मुख्यमंत्री शिर्डीत का आले माहीत नाही.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

आम्ही शिर्डीत साईबाबांचे आशीर्वाद घ्यायला आलो आहोत. शिर्डीत मुख्यमंत्री का धावाधाव करत आहेत माहीत नाही. शिर्डीतला त्यांचा उमेदवार शंभर टक्के पडणार आहे. आमचे भाऊसाहेब वाघचौरे यांना शिर्डीच्या साईबाबांचाही आशीर्वाद आहे आणि जनतेचाही आशीर्वाद आहे.” असं संजय राऊत म्हणाले.“

kamlakar

आधीच्या पाच आणि आत्ताच्या आठ एकूण १३ जागांवर मतदान झालं आहे. त्यातल्या १० जागा आम्ही जिंकू” असंही संजय राऊत म्हणाले तसंच अजित पवारांवरही त्यांनी भाष्य केलं.

“निवडणूक आयोग ही भाजपाची शाखा आहे. अतिरिक्त शाखा असलेल्या आयोगाकडून निष्पक्ष कामाची अपेक्षा आत्ता करणं चूक आहे. आमचं सरकार उद्या केंद्रात येईल तेव्हा घटनात्मक संस्थांची फेररचना आम्ही करु. आधीप्रमाणे राजकीय हस्तक्षेप न करता काम करतील असं आम्ही पाहू.” असंही संजय राऊत म्हणाले.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button