
शिर्डी येथे पुन्हा एकदा गुंडागिरीचे विद्रुप रूप समोर आले आहे. श्री साईबाबा संस्थान रुग्णालयातील उप वैद्यकीय संचालक डॉ. प्रितम वडगांववे (वय 47) यांच्यावर रुग्णालयात घुसून थेट त्यांच्या कार्यालयातच अत्यंत अश्लील शिवीगाळ, दमबाजी आणि चापटांनी मारहाण करण्यात आली. देवासमान डॉक्टरांवर झालेल्या या निर्घृण हल्ल्याने संपूर्ण शिर्डी हादरली आहे.
📌 आरोपींची ओळख – शिर्डीतीलच राक्षसी कृत्य
या प्रकरणात शिर्डी पोलिसांनी खालील आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे:
- सचिन विश्वनाथ काळे
- कोमल सचिन काळे (पत्नी)
- सचिन काळेचा भाऊ (नाव अद्याप सुप्त)
तिघांनी मिळून थेट रुग्णालयाच्या कार्यालयात शिरून डॉक्टरला धमकावले आणि मारहाण केली.
📌 हल्ल्याचं नेमकं काय झालं? — पोलिसांनी नोंदवलेला घटनाक्रम
दि. 20/11/2025 रोजी दुपारी 12.30 वा., आरोपी तिघांनी साईबाबा हॉस्पिटलमध्ये घुसून डॉ. प्रितम यांच्या कार्यालयात हल्ला केला.
पोलिस FIR मध्ये नमूद केले आहे की:
डॉक्टरांवर अत्यंत अश्लील शिवीगाळ
“परवा दिलेल्या तक्रारीचं काय झालं?” म्हणत दमदाटी
आरोपी 1 आणि 2 यांनी डॉक्टरांना चापटांनी मारहाण
शासकीय कामात अडथळा निर्माण
हॉस्पिटलसमोर “आम्ही पेटवून देऊ” अशी धमकी
रुग्णालयात आरडा-ओरडा करून दहशत माजवली
या प्रकारामुळे पेशंट, महिला रुग्ण, नर्सेस आणि स्टाफ घाबरून थरारला.
📌 कोणती कलमे लावली? — कडक गुन्हे दाखल
शिर्डी पोलिसांनी गुन्हा क्रमांक 995/2025 नुसार खालील गंभीर कलमे लावली आहेत:
भा.दं.सं. 132, 296, 351, 352, 3(5)
वैद्यकीय सेवा संस्था व व्यक्ति विरोधातील हिंसक कृत्य प्रतिबंध अधिनियम 2010 चे कलम 4
हा कायदा डॉक्टर व रुग्णालयावर हल्ला करणाऱ्यांना थेट कडक शिक्षा देण्यासाठी ओळखला जातो.
📌 OPD बंद — कर्मचारी संतप्त
डॉक्टरला मारहाण झाल्यानंतर साईबाबा हॉस्पिटलचा संपूर्ण स्टाफ संतप्त झाला.
त्यांनी तातडीचा निर्णय घेतला:
👉 OPD बंद आंदोलन सुरू!
डॉक्टर्स, नर्सेस आणि स्टाफ यांनी या हल्ल्याच्या निषेधात तातडीने OPD बंद केली आहे.
स्टाफची मागणी —
“डॉक्टरांवर हात उगारणाऱ्यांना अटक करून कडक कारवाई करा, अन्यथा आमचे आंदोलन अधिक तीव्र होईल.”
📌 वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती
घटनास्थळी खालील अधिकारी तातडीने दाखल झाले:
मा. SDPO अमोल भारती
पो.नि रणजित गलांडे
सपोनि अमित वाळके
पोहेकाँ लांडे (1432)
त्यांनी डॉक्टरांसोबत चर्चा करून तक्रार दाखल केली आणि हॉस्पिटल परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावण्यात आला.
📌 शिर्डीत रुग्णालयातही सुरक्षितता नाही?
एकीकडे शिर्डी हे विश्वविख्यात धार्मिक स्थळ, तर दुसरीकडे शहरात वारंवार वाढणारी गुंडागिरी — नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.
डॉक्टर म्हणजे जीवदान देणारे…
आणि त्यांनाच रुग्णालयात हल्ला सहन करावा लागणे — संपूर्ण समाजासाठी लज्जास्पद! आहे
“शिर्डीत गुंडागिरी संपणार कधी?”
शिर्डीत घडलेल्या या हल्ल्यानंतर सर्वांचे लक्ष पुन्हा एकदा शिर्डीतील वाढत्या गुंडागिरीकडे गेले आहे. काही महिन्यांपूर्वी डॉक्टर सुजय विखे यांनी जाहीरपणे सांगितले होते —
“शिर्डीतील गुंडागिरी व माजोरीपणा आम्ही पूर्णपणे संपवू!”
पण प्रत्यक्ष परिस्थितीकडे पाहिल्यास, शिर्डीतील रुग्णालयाच्या दारातच गुंडांनी घुसून
डॉक्टरला मारहाण करण्याइतकी दादागिरी वाढली आहे.
लोकांचा प्रश्न आता थेट सुजय विखेंकडे :
👉 “शिर्डीत लाखो रुग्णांचे जीव वाचवणाऱ्या डॉक्टरांनाच मारहाण होत असेल, तर साधा नागरिक किती सुरक्षित?”
या घटनेनंतर रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्सेस आणि कर्मचारी वर्गात प्रचंड संताप आहे. स्टाफचे म्हणणे एकदम स्पष्ट आहे —
“असे प्रकार चालूच राहिले, गुंड रुग्णालयात येऊन हल्ले करत राहिले तर एक दिवस साईबाबा संस्थानाचे दोन्ही दवाखाने बंद करण्याची वेळ येईल!”
हे वाक्य साधं नाही…
हा आस्मानी इशारा आहे, ज्यातून रुग्णालयातील तणाव आणि भीतीची लेव्हल समजते.
स्टाफची आर्जवे, मागणी आणि इशारा हे तिन्ही सुजय विखे यांच्यासाठी थेट संदेश आहेत:
**👉 “स्वतः सुजय विखेंनी तात्काळ लक्ष घालावे!
शिर्डीच्या रुग्णालयात गुंडागिरी सहन केली जाणार नाही.”**
नागरिकांचंही त्याचं मत:
आरोग्य केंद्र म्हणजे सेवा,
हॉस्पिटल म्हणजे आशेचं ठिकाण,
आणि डॉक्टर म्हणजे देव!
अशा देवासमान डॉक्टरांना रुग्णांच्या समोरच मारहाण केली जात असेल तर
शिर्डीच्या सुरक्षेचा प्रश्न विकोपाला गेला आहे, अशी भावना सर्वत्र दिसत आहे.
पोलिसांनी कारवाई केली असली तरी,
गुंडागिरीची मुळापासून सफाई करण्यासाठी सुजय विखेंनी स्वतः पुढाकार घेण्याची गरज
स्टाफ, नागरिक आणि रुग्ण परिवार व्यक्त करीत आहेत.

