Letest News
साईनिर्माण परिवार व श्री साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित भव्य तीर्थयात्रेला गुरुवारी उत्साहपूर्ण प... समृद्धीवर दरोडा… मागे गुटखा तस्करांचे ‘कनेक्शन’?राहुरीच्या उद्योजकाला लुटणाऱ्या टोळीतील कुख्यात किरण... नव्या जागेवरून सत्ताधारी-विरोधकांत जोरदार जुंपली! चेअरमन विठ्ठलराव पवारांचा विरोधकांवर घणाघात राहाता शहरात मावा-गुटख्याचा काळाबाजार उघड! स्थानिक गुन्हे शाखेचा छापा-तिघांविरुद्ध गुन्हा-अवैध तंबाख... चिन्नाराव हॉटेल प्रकरणाने शिर्डीत खळबळ आता शिर्डी नगर परिषद कारवाई करणार का? रक्षाबंधनाचा स्नेहसोहळा शिर्डीत उत्साहात- महिलांनी सुजय विखे यांच्या हातावर बांधली राखी बनावट नंबरच्या बेवारस दुचाकीचा छडा- साई संस्थानच्या सुरक्षा विभागाने शोधला मूळ मालक महाराष्ट्रात तुकाराम मुंडे… तर तेलंगणात वैभव गायकवाड! अहिल्यानगरच्या भूमिपुत्राच्या धडक कारवाईने गुन... पत्रकारितेतील चार दशकांचा प्रदीर्घ प्रवास- असंख्य पत्रकारांचे मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख... “राधाकृष्ण विखेंना हटवा…” जरांगेंच्या निर्णायक आंदोलनापूर्वीच मुख्यमंत्र्यांना थेट पत्र!
अ.नगरशिर्डी

शिर्डीत साई संस्थांनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विधिवत पूजन करून पेटवण्यात आली होळी!

शिर्डी (प्रतिनिधी) फाल्गुन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमा. होळी पौर्णिमेचं दुसरं नाव म्हणजे हुताशनी पौर्णिमा. होळी हा सण शहरात तसंच खेड्या-पाड्यातून मोठ्या आनंद आणि उत्साहानं साजरा केला जातो. तसा तो साईबाबांच्या शिर्डीतही मोठ्या भक्तीभावानं साजरा केला जातो. आज गुरुवारी सकाळी साडेअकराला साईबाबांच्या गुरुस्थान समोर साईबाबा संस्थानच्या वतीनं होळीचं पूजन करून दहन करण्यात आलं.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

तर साईंच्या सानिध्यात होळी साजरी करण्यासाठी देश-विदेशातून भाविक शिर्डीत दाखल झाले होते. साईबाबांच्या शिर्डीत प्रत्येक उत्सव मोठ्या भक्ती भावाने साजरा केला जातो. साईबाबा मंदिर परिसरातील गुरुस्थान मंदिरासमोर पारंपरिक पद्धतीनं होळीचं दहन करण्यात आलं. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सपत्नीक होळीची पूजा करून होळीचं दहन केलं. तसंच पालथ्या हातानं शंखध्वनी अर्थात बोंब मारत मनातील अनिष्ठ प्रवृत्ती शांत होवो,

अशी प्रार्थना साईबाबा संस्थान आणि भक्तांनी साईबाबांच्या चरणी केल्याची माहिती माजी विश्वस्त सचिन तांबे यांनी दिली.
साई मंदिरात पारंपरिक पद्धतीनं होळीचं दहन
समाधी मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट : होळीचा सण हा आज संपूर्ण भारतभर साजरा केला जात आहे. होळी साजरी करण्याची परंपरा पूर्वकाळापासून चालत आली आहे.

साईबाबांच्या शिर्डीतही होळी पूजन करून दहन करण्याची प्रथा साईबाबांच्या काळापासून सुरू आहे. ही परंपरा जोपासत साईबाबा संस्थानच्या वतीनं गुरुस्थान समोर मध्यान्ह आरती अगोदर होळीची विधीवत पूजा करून होळीचं दहन केलं. तर सायंकाळी द्वारकामाई मंदिरासमोर साईबाबा संस्थान, साईभक्त आणि ग्रामस्थ सामूहिक होळीचं दहन करतात. आज होळी असल्यानं साईबाबांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला. त्यानंतर मध्यान्ह आरती पार पडली.

यावेळी साईबाबाच्या मूर्तीला साखरेनं बनवलेला गाठीची माळ घालण्यात आली. तर आज होळीच्या निम्मितानं युनायटेड किंडममध्ये राहत असलेल्या दानशूर साईभक्‍त अखिल गुप्‍ता यांच्‍या देणगीतून समाधी मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. होळी निमित्ताने साई भक्तांनी दर्शन घेतले.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button