Letest News
शिर्डीच्या दोन दमदार व्यक्तिमत्त्वांचा गौरव-विठ्ठलराव पवार आणि दिलीप खरात सन्मानित शिर्डीत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर-गरजू रुग्णांसाठी मोठा दिलासा अहिल्यानगर पोलीस मुख्यालयात स्मोक हँड ग्रेनेडचा स्फोट-चार प्रशिक्षणार्थी पोलीस जखमी समता पतसंस्थेच्या “मॅनेजरच्या सांगण्यावरूनच पैसे टाकले” भोंदू खरातची न्यायालयात धक्कादायक कबुली वंदे भारतने मुंबई ते शिर्डी-मुख्यमंत्री फडणवीसांचा साधेपणाचा संदेश राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री फडणवीस साईचरणी नतमस्तक-भक्ती ते शक्ती : शिर्डीत डिफेन्स प्रकल्पाचे भव्य ... “शिर्डीत पेट्रोलसाठी झुंबड! पंपांवर लांबच लांब रांगा=नागरिकांना संयम ठेवण्याचे आवाहन” स्मार्ट ग्राम’चा फक्त गाजावाजा; सावळीविहीरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ!”“CCTV बंद स्ट्रीट लाईट गुल-सावळी... “क्लबवर छापे… पण ‘मुख्य सूत्रधार’ अजूनही मोकाट?”“राहात्यात अवैध धंद्यांना कोणाचा राजकीय वरदहस्त?” “गर्भलिंग चाचणी रॅकेटचे धागेदोरे निफाडपर्यंत १८ आरोपी जेरबंद ६ डॉक्टर अटकेत!”
राजकीयशिर्डी

श्री साई विसावा मंदिराचा ४ था वर्धापन दिन आज उत्साहात-काकड आरती-दत्तात्रेय हवन- भजन संध्या व महाप्रसादाचे आयोजन

शिर्डी | प्रतिनिधी
शिर्डीच्या साईबाबांच्या अनंत कृपेने रांजणगाव देशमुख (ता. कोपरगाव) येथील श्री साई विसावा मंदिराचा चौथा वर्धापन दिन शनिवार दि. १४ मार्च २०२६ रोजी भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
वर्धापन दिनानिमित्त पहाटे सकाळी ६ वाजता मंदिर खुले होणार असून ७ वाजता काकड आरती होईल. त्यानंतर सकाळी ८ वाजता श्री दत्तात्रेय हवन पूजन करण्यात येणार आहे. दुपारी १२.३० वाजता साईबाबांची मध्याह्न आरती होणार असून दुपारी १ वाजता महाप्रसादाला सुरुवात होणार आहे.
सायंकाळी ५ वाजता धूप आरती तर सायंकाळी ६ वाजता पुणे येथील साई मित्र टीम यांच्या वतीने साई भजन संध्या आयोजित करण्यात आली आहे. रात्री १० वाजता साईबाबांची शेज आरती झाल्यानंतर १०.३० वाजता मंदिर बंद करण्यात येईल.
“सबका मालिक एक” तसेच “श्रद्धा आणि सबुरी” या साईबाबांच्या संदेशाने प्रेरित होत हा वर्धापन दिन साजरा केला जात असून सर्व साईभक्तांनी कुटुंबासह उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री साई विसावा मंदिर, साई विसावा टीम, श्री साईबाबा भक्त परिवार व सारंगधर परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button