Letest News
मध्यरात्री दरोड्याने थरकाप-अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाची दमदार कामगिरी – आंतरजिल... शिर्डीत ‘जमीन सौदा’ बॉम्ब फुटणार? भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरातच्या ५० कोटींच्या व्यवहारावर पोलिसांची ... पोटनिवडणुकीत माध्यमांवर कडक नियम-जाहिरातींसाठी पूर्व मंजुरी अनिवार्य नाशिक प्रकरणात खळबळ! भोंदू बाबा अशोक खरातच्या पोलीस कोठडीत वाढ – ‘५ नरबळी’चा धक्कादायक संशय शिर्डीतील ‘क्लासिक आइसक्रीम’ची जागतिक भरारीकडे वाटचाल-नूतन आइसक्रीम युनिटचे भव्य उद्घाटन   ब्रेकिंग : ‘पेनड्राईव्ह’साठी रचला गेला मोठा कट-अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ  वाघचौरे यांना फसवण्याचा... सुपर ब्रेकिंग : ‘पेनड्राईव्ह’साठी रचला गेला मोठा कट asp वाघचौरे यांना फसवण्याचा प्रयत्न फसला! ६,५०० रुपयांच्या लाचेप्रकरणी जिल्हा परिषद अभियंता जाळ्यात! ACB ची धडक कारवाई शिर्डीत ११५ वा श्रीरामनवमी उत्सव-लाखो साईभक्तांच्या स्वागतासाठी भव्य तयारी पूर्ण! खरातचा काळा खेळ उघड! शिर्डी पोलिसांची गुप्त मोहीम ठरली निर्णायक
अ.नगर

निरीक्षण गृह व बालगृहातील मुला मुलींनी बनवलेल्या राख्यांचे व वस्तूंचे प्रदर्शन जिल्हा न्यायालयात संपन्न

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व कॅटलिस्ट फॉर सोशल ॲक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालयात दिनांक नऊ ऑगस्ट रोजी अहमदनगर जिल्ह्यातील निरीक्षणगृह व बालगृहातील मुलांनी बनवलेल्या राख्या व वस्तूंचे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले होते.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते .प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी, सौ. मालती यार्लगड्डा हे उपस्थित होते. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती भाग्यश्री पाटील, सर्व न्यायिक अधिकारी, अहमदनगर बार असोसिएशनचे सचिव ॲडव्होकेट संदीप शेळके, अहमदनगर सेंट्रल बार असोसिएशनचे सचिव ॲडव्होकेट योगेश काळे,जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील, कॅटलिस्ट फॉर सोशल ॲक्शन या संस्थेच्या लुई मॅथ्यूज, जुई झावरे, दोन्ही वकील संघातील विधिज्ञ, न्यायालयीन कर्मचारी हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षास्थानावरून बोलताना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री सुधाकर यार्लगड्डा यांनी निरीक्षण गृह व बालगृहातील मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाजाच्या सर्वच घटकांनी हातभार लावणे गरजेचे आहे असे सांगितले .तसेच सर्व शासकीय यंत्रणांनी त्यांच्या प्रती संवेदनशील असणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले. यावेळी बोलताना अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय देखील निरीक्षणगृह व बालगृहातील मुलांसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोबत उपक्रम राबवेल असे आश्वासन दिले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती भाग्यश्री पाटील यांनी सर्वांनी मनाचे औदार्य दाखवून मुला मुलींनी बनवलेल्या राख्या व वस्तू विकत घेऊन त्यांना उभारी देण्याचं काम करावं असे आवाहन केले . अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री सुहास मापारी यांनी अहमदनगर जिल्ह्याचा लोक अदालत मध्ये राज्यात तिसरा क्रमांक आल्याबद्दल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री सुधाकर यार्लगड्डा व सचिव श्रीमती भाग्यश्री पाटील यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव भाग्यश्री पाटील यांनी केले. सर्व न्यायिक अधिकारी , दोन्ही वकील संघातील विधीज्ञ , न्यायालयीन कर्मचारी, पक्षकार यांनी विविध वस्तूंची खरेदी करून कार्यक्रम यशस्वी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट सुनील मुंदडा यांनी केले व आभार प्रदर्शन ॲडव्होकेट भक्ती शिरसाठ यांनी केले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button