Letest News
शिर्डीत मध्यरात्री संशयास्पद हालचाली दुचाकीसह दोघे पोलिसांच्या जाळ्यात! संकटात साई संस्थान ठरले आधारवड!कर्मचाऱ्यास अपघात विम्यापोटी साडेतीन लाखांची मदत पर्युषण महापर्वानिमित्त जिल्ह्यातील कत्तलखाने मांस विक्री केंद्रे बंद जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया य... चाकूचा धाक दाखवून तरुणीला घेऊन पसार! भावाला लाथाबुक्क्यांनी मारहाण रोशन घेगडमलसह दोघांविरुद्ध तक्रार प्रवीणभाऊ आल्हाट यांची मानवाधिकार असोसिएशनच्या अहिल्यानगर उत्तर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती थरावर थर… कौशल्याचा कहर! शिर्डीत सनमित्र-क्रांतीच्या दहीहंडीचा पुन्हा एकदा जल्लोष अहिल्यानगरचा डाग पुसण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची धडपड शिर्डीतील काही पोलिसांमुळे प्रयत्नांना तिलांजल... ड्रेनेजची तक्रार केली म्हणून महिलेवर हात उचलला! लाथाबुक्क्यांनी मारहाण दगडाने डोके फोडले ‘कुटुंबाला... शिर्डीत भक्तिमय वातावरणात श्री गोकुळाष्टमी उत्सव उत्साहात अनाथ बालकांसोबत ‘दबंग’ अधिकाऱ्याचा वाढदिवस!कायदा-सुव्यवस्थेत कणखर भूमिका सामाजिक जाणीवेतही तितकीच सं...
अ.नगरक्राईम

गर्भलिंग चाचणी रॅकेटमध्ये पुण्यातील तीन जण अटकेत -बेकायदेशीर सोनोग्राफी मशीन पुरवठा प्रकरणात कारवाई

अहिल्यानगर : लोणी पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गर्भलिंग चाचणी व बेकायदेशीर गर्भपात प्रकरणातील तपास अधिक व्यापक होत असून या गुन्ह्यात आता पुण्यातील तीन जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये दोन डॉक्टर व एका व्यक्तीचा समावेश असून न्यायालयाने तिन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणात यापूर्वी तीन डॉक्टर, चार एजंट आणि सहा गर्भवती महिलांचे कुटुंबीय अशा एकूण १३ आरोपींना अटक करण्यात आली होती. आज झालेल्या नव्या कारवाईनंतर या गुन्ह्यातील अटक आरोपींची संख्या १६ वर पोहोचली असून त्यामध्ये आता पाच डॉक्टरांचा समावेश आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


तपासादरम्यान पोलिसांनी बेकायदेशीर गर्भलिंग निदानासाठी वापरण्यात येणारी दोन सोनोग्राफी मशीन जप्त केली आहेत. त्यापैकी एक मशीन नेवासा येथील आरोपी डॉक्टर भणगे यांच्याकडून तर दुसरे मशीन अटक आरोपी रवींद्र ढगे याच्याकडून जप्त करण्यात आले. तपासात ही दोन्ही मशीन कोणत्याही अधिकृत नोंदणीशिवाय बेकायदेशीररीत्या वापरली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.


पोलीस कोठडीत आरोपींकडे केलेल्या चौकशीत ही मशीन पुणे येथील आरोपींकडून खरेदी केल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पोलिसांनी डॉक्टर आकाश सुभाष मलगुंडे (शिरूर), डॉक्टर नीलकंठ अशोक जाधव (लोहगाव) आणि नरेंद्र साहेबराव ठाकरे (केसनंद, हवेली) यांना ताब्यात घेतले. काल रात्री उशिरा त्यांना लोणी पोलीस स्टेशन येथे आणून अटक करण्यात आली.
आज न्यायालयात हजर केले असता पोलिसांनी आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मंजूर करत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आता या आरोपींनी प्रतिबंधित सोनोग्राफी मशीन कुठून खरेदी केली, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास केला जाणार आहे.


ही संपूर्ण कारवाई अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे पुढील तपास करत आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button