Letest News
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष...
अ.नगरशिर्डी

शिर्डीत दत्तजयंती उत्सवाची भक्तिमय रोषणाई – फुलांच्या दिव्य सजावटीने भाविक मंत्रमुग्ध

शिर्डी : श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी यांच्या वतीने आयोजित स्थानिक दत्तजयंती उत्सवाला आज उत्साहपूर्ण सुरुवात झाली. साईभक्त श्रीमती रजनी डांग यांच्या देणगीतून साईबाबा समाधी मंदिर, श्री दत्त मंदिर आणि परिसरात करण्यात आलेली फुलांची आकर्षक सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत असून संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने उजळून निघाला आहे.

sai nirman
जाहिरात

दुपारपासूनच मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी होत असून, दत्तजयंतीनिमित्त सर्व धार्मिक कार्यक्रमांचा शानदार कार्यक्रम क्रम जाहीर करण्यात आला आहे.

DN SPORTS

kamlakar

कीर्तन, आरत्या आणि धार्मिक विधींचा दिव्य सोहळा

आज सायंकाळी ४ ते ६ दरम्यान मारुती मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडप येथे ह.भ.प. सौ. स्नेहल संजय कुलकर्णी (नाशिक) यांचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर सायं. ६ वाजता श्रींची धुपारती होईल.

लेंडीबाग येथील श्री दत्त मंदिरात श्रीदत्त मूर्ती व पादुकांवर अभिषेक पूजन आणि श्री दत्तात्रयांची आरती सायंकाळी विधीपूर्वक पार पडेल.

रथोत्सवाची उत्साहपूर्ण मिरवणूक

रात्रौ ९.१५ वाजता श्रींच्या रथाची भव्य मिरवणूक गावातून निघेल. पारंपारिक वाद्यांचा नाद, टाळ-मृदंगाचा गजर आणि भक्तांच्या जयजयकारांनी संपूर्ण शिर्डी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघणार आहे.

चावडी पूजन व शेजारतीने समाप्ती

गुरुवार असल्याने आज नित्याचे चावडी पूजन होईल. रात्री १०.३० वाजता (पालखी मिरवणूक परत आल्यानंतर) श्रींची शेजारती संपन्न होईल. या सर्व कार्यक्रमांना भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button