Letest News
शिर्डीत हरवलेला ‘आयफोन’ साईभक्तेला परत शिर्डी पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी साईचरित्र पारायणाची भक्तिमय सांगता आज सायंकाळी शिर्डीत पोथीची भव्य मिरवणूक साईचरणी कोते-गोंदकर परिवाराची श्रद्धेची लाखमोलाची ओंजळ!श्री साईचरित्र पारायण सोहळ्यासाठी दोन्ही परिव... विद्यमान खासदार नीलेश लंके यांचा माजी खासदार सुजय विखेंवर नावानिशी हल्लाबोल ‘डोनाल्ड ट्रम्पला स्वियस... साईभक्तांची लूट थांबवणार कोण? वाहतूक शाखेचे ‘अतिकर्तव्यदक्ष’ अधिकारी येसेकर नामदार विखेंच्या आदेशाची... चिक्की-बिस्किटांच्या नावाखाली गुटखा विक्रीचा आरोप पोलिसांनी तातडीने कारवाई करावी शिर्डीतील गुटखा तस्करीचा सूत्रधार कोण? १२ आरोपींनंतर आता ‘आका’पर्यंत पोलिसांचा तपास पोहोचणार का? गुटख्याच्या काळ्या बाजाराला एलसीबीचा दणका! तिघांना न्यायालयात हजर करताच एक दिवसाची पोलीस कोठडी पुरवठ... डॉ. सुजय विखेंचा मेंदू खराब झाला’- रोहित पवारांचा बोचरा पलटवार उदयपूर ते शिर्डी सातवी पदयात्रा भक्तिभावात पूर्ण- साईभक्त मोहित आचार्य यांचे शिर्डीत आगमन
अ.नगरक्राईम

“चाकणकरांचा स्फोटक आरोप-कोयटे पिता-पुत्रांचा बचाव – खोटं कोणाचं?”

बोगस खात्यांचा स्फोट!” – समता पतसंस्था प्रकरणात आरोप-प्रत्यारोपांचा जंगी संग्राम 🔥
शिर्डी/राहाता : समता पतसंस्थेतील कथित बोगस खात्यांच्या घोटाळ्याने आता स्फोटक वळण घेतले असून, काल तब्बल ७ तास पोलिस चौकशीला सामोरे गेलेल्या चाकणकर यांनी बाहेर येताच थेट स्फोट केला –
“मी कधीच त्या पतसंस्थेत गेले नाही… माझे खातेच नाही… माझ्या सह्या बनावट आहेत!”
या एकाच विधानाने संपूर्ण प्रकरणात खळबळ उडाली आहे.
⚡ दोन बाजू, दोन दावे – सत्य कुणाच्या बाजूने?
एका बाजूला चाकणकर यांचा ठाम आरोप…
तर दुसऱ्या बाजूला समता पतसंस्थेचे संस्थापक काका कोयटे व संदीप कोयटे यांची घाईघाईतील पत्रकार परिषद –
“आमच्या संस्थेत एकही खाते बोगस नाही!”

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


👉 मग खोटं कोण बोलतंय?
हा प्रश्न आता फक्त चर्चेचा नाही, तर विश्वासघाताचा मुद्दा बनला आहे.
🚨 “हे खाते आमचंच नाही!” – खातेदारांचा एकच सूर
पोलिसांनी आतापर्यंत ४० ते ५० खातेदारांची चौकशी केली… आणि धक्कादायक बाब म्हणजे बहुतेकांनी एकच उत्तर दिलं –
“हे खाते आमचं नाही!”
👉 एक-दोन नाही… तर मोठ्या संख्येने लोक एकच गोष्ट सांगत असतील, तर
ही चूक आहे की संगनमताने चाललेला घोटाळा?
असा संतप्त सवाल आता जनतेतून विचारला जात आहे.


⚖️ कारवाई फक्त कर्मचाऱ्यांवरच का?
या प्रकरणात मॅनेजर व व्यवस्थापकांवर गुन्हे दाखल झाले…
पण स्थानिकांमध्ये प्रचंड रोष –
👉 “फक्त लहान माशांवर जाळं टाकून मोठे मासे सोडले जातायत का?”
कोयटे पिता-पुत्रांवरही गुन्हे दाखल करा, अशी मागणी आता जोर धरत असून,
प्रशासनावर दबाव वाढत चालला आहे.
🔥 “सोंग की सत्य?” – जनतेचा संताप उफाळला
चौकशीदरम्यान समोर आलेल्या माहितीमुळे
बनावट सह्या, बोगस खाती आणि आर्थिक गैरव्यवहाराचा मोठा जाळा असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
👉 तरीही कोयटे पिता-पुत्रांचे “सगळं सुरळीत” असल्याचे दावे
जनतेला आता “खोटं सोंग” वाटू लागले आहेत.
🔍 अंतिम सत्य लवकरच बाहेर?
पोलिस तपास निर्णायक टप्प्यात पोहोचला असून,
खरे-खोटे लवकरच समोर येणार हे निश्चित मानले जात आहे.
पण एक गोष्ट स्पष्ट –
👉 जर आरोप खरे ठरले, तर हा फक्त पतसंस्थेचा प्रश्न राहणार नाही, तर संपूर्ण व्यवस्थेवरचा विश्वास डळमळीत करणारा घोटाळा ठरेल!
🚨 “आता वेळ आली आहे सत्याची… आणि जबाबदार कोण, याचा हिशोब देण्याची!”

पोलीस कोयटे बंधूंना पाठीशी घालत तर नाही ना?
समता पतसंस्थेच्या गाजत असलेल्या प्रकरणात पोलिसांची भूमिका सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. एकीकडे अनेक खातेदार “हे खाते आमचे नाही” असा ठाम दावा करत आहेत, तर दुसरीकडे मुख्य आरोपांच्या भोवऱ्यात असलेल्या कोयटे पिता-पुत्रांवर अद्याप ठोस कारवाई झालेली दिसत नाही.
👉 यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संशयाची कुजबुज सुरू झाली आहे –
“पोलिसांचा तपास निष्पक्ष आहे का, की कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे?”
स्थानिकांमधून आता स्पष्ट मागणी होत आहे की,
✔️ तपास पूर्णपणे पारदर्शक व्हावा
✔️ संबंधित सर्वांवर समान कारवाई व्हावी
✔️ दोषी कोणताही असो, त्याला कायद्यापुढे उभे केले जावे
⚖️ सत्य बाहेर येणे गरजेचे आहे… अन्यथा ‘न्याय’ या शब्दावरच प्रश्नचिन्ह उभे राहील!

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button