Letest News
साईबाबांविरोधातील वक्तव्यावर गौतम खट्टर नमले-राहाता न्यायालयात चूक मान्य-यापुढे आक्षेपार्ह भाष्य करण... घरासमोरच उघडपणे सुरू होता लाखोंच्या उलाढालीचा जुगार अड्डा-स्थानिक गुन्हे शाखेच्या धाडीत रोख रक्कम-मो... दिव्यांगावर दहशत! मारहाण-शिवीगाळ-मोबाईलची तोडफोड- सचिन भैरवकर आरोपीवर गंभीर गुन्हा दाखल सावळी विहीरच्या दूध संकलन केंद्रावर एफडीएची धडक कारवाई-परवाना तात्काळ निलंबित साईबाबा रुग्णालयातील स्टाफ नर्स विरुद्ध ७.९० लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा शिर्डीत ५५ सभासदांच्या मालमत्तेवर न्यायालयाचा 'ब्रेक' २७.९८ लाखांच्या थकबाकीप्रकरणी विक्री-हस्तांतरण... शिर्डी विविध कार्यकारी सोसायटीचे १ हजार मेट्रिक टन क्षमतेचे अन्नसुरक्षा भांडारचे काम प्रगतीपथावर शिर्डीत ३२ व्या श्री साईसच्चरित पारायण सोहळ्याची तयारी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात शिर्डीत १५ वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या श्रीरामनगर परिसर हादरला साईदर्शनासाठी आलेल्या चार वर्षीय चिमुकलीचा शिर्डीत भीषण अपघातात मृत्यू-साईनगरी हळहळली
राजकीयशिर्डी

शिर्डी विविध कार्यकारी सोसायटीचे १ हजार मेट्रिक टन क्षमतेचे अन्नसुरक्षा भांडारचे काम प्रगतीपथावर

शिर्डी प्रतिनिधी / शिर्डी शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिर्डी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड शिर्डी ही ७५ वर्षे जुनी सोसायटी असून सोसायटीच्या माध्यमातून एक हजार मॅट्रिक टन क्षमतेचे अन्नसुरक्षा भांडारचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती सोसायटीचे चेअरमन प्रमिला विजय शेळके व सचिव संदीप बढे यांनी दिली
चेअरमन प्रमिला शेळके म्हणाल्या की पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजय विखे पाटील व सर्व संचालक मंडळ तसेच जिल्हा सहकारी बँकेच्या एक विचाराने जवळपास १ कोटी १६ लाख रुपये खर्च करून अन्नसुरक्षा भांडारचे काम हाती घेण्यात आले असून ते काम प्रगती पथावर आहे

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

शासकीय हमीभाव केंद्र खते वितरण साठवणूक व शेतकऱ्यांचा माल खरेदी करून त्यावर प्रक्रिया करणे गोदाम पूर्ण झाल्यानंतर सुलभ होणार आहे त्याबरोबर शेतकरी अडचणीत असताना सोसायटीच्या कर्जदार सभासदांनी ३० जून आहेत 100% बँक पातळीवर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे त्याबद्दल देखील समाधान व्यक्त केले जात असून सोसायटीचे कार्यक्षेत्र शिर्डी हे आहे शेतकऱ्यांना खते बी बियाणे रेशन आदी सेवा बरोबर शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ दिला जातो संचालकांचा एक विचार आर्थिक काटकसर पारदर्शक कारभार यामुळे सोसायटी प्रगतीपथावर असून शहरात मध्यवर्ती ठिकाणी स्वमालकीची तीन मजली इमारत गोदाम व तसेच २१ गुंठे जागा देखील आहे सोसायटीच्या प्रगतीत संचालक विजय गोंदकर, बाळासाहेब काटकर, नितीन कोते , विलास कोते,, विकास कोते, तानाजी गोंदकर, किरण कोते, बाळासाहेब जगताप, विजय गायकवाड ,प्रमोद गोंदकर ,सुनील कोते ,तज्ञ संचालक आप्पासाहेब कोते, रवींद्र कोते, आदींचे सहकार्य लाभत असल्याचे सचिव संदीप बढे यांनी सांगितले

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button