Letest News
ड्रेनेजची तक्रार केली म्हणून महिलेवर हात उचलला! लाथाबुक्क्यांनी मारहाण दगडाने डोके फोडले ‘कुटुंबाला... शिर्डीत भक्तिमय वातावरणात श्री गोकुळाष्टमी उत्सव उत्साहात अनाथ बालकांसोबत ‘दबंग’ अधिकाऱ्याचा वाढदिवस!कायदा-सुव्यवस्थेत कणखर भूमिका सामाजिक जाणीवेतही तितकीच सं... मध्यस्थीची भावना जुनी आधुनिक स्वरूप अधिक परिणामकारक! — न्या. शिवाजी कचरे प्रमुख जिल्हा व सत्र न्याया... कडक शिस्तीच्या अधिकाऱ्याला सर्वपक्षीय सलाम! अमोल मोरे यांची प्रांताधिकारीपदी पदोन्नती सापडलेला लाखाचा मोबाईल साईभक्ताला परत संस्थान कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाला सलाम! निर्व्यसनी तरुणाईची एकजूट ढोल-ताशांच्या गजरात रंगणार गोविंदांचा जल्लोष शिर्डीच्या साईदरबारी भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा गोकुळाष्टमीनिमित्त साईचरणी सोन्याचा ब्रोच अर्पण भगवान थोरात यांची ग्राहक संरक्षण समितीच्या राहाता तालुका प्रवक्तेपदी नियुक्ती
Blog

जम्मू व काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांनी घेतले श्री साईबाबांचे दर्शन

शिर्डी (प्रतिनिधी) जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल लेफ्टनंट मनोज सिन्हा यांनी आज शनिवारी शिर्डीला भेट देऊन श्री साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी त्यांच्याबरोबर साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवशंकर हे उपस्थित होते.
श्री साईबाबांच्या दर्शनानंतर त्यांचा साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवशंकर यांनी शाल श्रींची मूर्ती देऊन व श्री साई दैनंदिनी देऊन सत्कार केला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


मनोज सिन्हा हे सध्या जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल आहेत. मनोज सिन्हा यांनी वाराणसी येथे बी टेक ,एम टेक पदवी प्राप्त केली असून ते यापूर्वी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी कारभार पाहिलेला आहे. त्यांनी आज शनिवारी शिर्डीत येऊन श्री साईबाबा समाधी मंदिरात जाऊन श्री साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी पोलीस बंदोबस्त व साईबाबा संस्थानचे सुरक्षा रक्षक
ही तैनात होते.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button