Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
राजकीयशिर्डी

“छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे” : राजमाता कल्पनाराजे

शिर्डी : राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विविध विषयांवर परखड मत व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव सर्वजण घेतात, मात्र त्यांच्या विचारांनुसार वागण्याची तयारी समाज आणि राजकीय नेत्यांमध्ये दिसत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
“शिवराज्य हवे असेल तर केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही, तर त्यांच्या विचारांचे आणि कार्यपद्धतीचे अनुकरण करावे लागेल,” असे त्या म्हणाल्या. शिवाजी महाराजांनी उभारलेल्या स्वराज्याचा इतिहास आणि वारसा जपणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


राज्यातील सध्याच्या राजकारणावरही त्यांनी टीका करताना लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या कार्यक्षमतेबाबत आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे सांगितले. “लोकशाही म्हणजे लोकांचे, लोकांसाठी आणि लोकांकडून चालणारे राज्य; मात्र प्रत्यक्षात तसे चित्र दिसत नाही,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
गड-किल्ल्यांच्या संवर्धनाबाबत बोलताना रायगडासह ऐतिहासिक वारशाचे जतन आणि पुनरुज्जीवन करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. गडांच्या दुरुस्तीसाठी मंजूर होणाऱ्या निधीचा योग्य वापर होत आहे का, याची चौकशी आणि नियमित पाहणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.


प्रतापगडावरील निकृष्ट दर्जाच्या दुरुस्ती कामांबाबत संताप व्यक्त करत योग्य आणि जाणकार व्यक्तींनाच समित्यांमध्ये स्थान दिले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच शिवाजी महाराज, शहाजी महाराज, संभाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्या कार्यावर आधारित “शिवसृष्टी” उभारण्याची आपली संकल्पना असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर झालेल्या या संवादात राजमाता कल्पनाराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्याची गरज पुन्हा अधोरेखित केली.


राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्यातील राजकारण, गड-किल्ल्यांचे संवर्धन, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि लोकशाही व्यवस्थेवर परखड भाष्य केले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार केवळ भाषणापुरते मर्यादित न ठेवता ते आचरणात आणण्याची गरज व्यक्त केली.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button