Letest News
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष...
क्राईमशिर्डी

मंदिर परिसरात कोयता फिरवत दहशत-शिर्डी पोलिसांची धडक कारवाई-तरुण गजाआड

मंदिर परिसरात भरदिवसा हातात धारदार कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणाला शिर्डी पोलिसांनी बेड्या ठोकत त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेमुळे सावळीविहीर खुर्द गावात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
शिर्डी प्रतिनिधी : धार्मिक स्थळाच्या परिसरात हातात धारदार कोयता घेऊन उघडपणे फिरत आरडाओरडा करत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका तरुणाविरुद्ध शिर्डी पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. तेजस गोपाल गायकवाड (वय २८, रा. सावळीविहीर खुर्द, ता. राहाता) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, संबंधित तरुण काहीतरी गैरकृत्य करण्याच्या उद्देशाने मंदिर परिसरात कोयता घेऊन फिरत आहे. माहितीची गांभीर्याने दखल घेत शिर्डी पोलिसांनी तातडीने पथक रवाना केले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचताच संबंधित तरुण भररस्त्यात हातात कोयता घेऊन आरडाओरडा करताना दिसून आला. त्याच्या या धिंगाण्यामुळे नागरिकांमध्ये एकच घबराट पसरली होती. परिसरातील दुकानदार भयभीत झाले होते, तर अनेक नागरिकांनी सुरक्षिततेसाठी घटनास्थळापासून दूर पळ काढला.
पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीमध्ये त्याच्याकडून सुमारे १७.५ इंच लांबीचा धारदार कोयता जप्त करण्यात आला. सदर शस्त्र बाळगण्याबाबत विचारणा केली असता आरोपीकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही.


सार्वजनिक ठिकाणी हातात घातक शस्त्र घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या या प्रकारामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आरोपीविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ च्या कलम ४ व २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
धार्मिक स्थळांच्या परिसरात अशा प्रकारे शस्त्रांचे प्रदर्शन करून दहशत माजवणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button