Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
क्राईमशिर्डी

सावळीविहीर शिवारातील जुगार अड्ड्यावर शिर्डी पोलिसांची धडक-९ आरोपींवर गुन्हा-सुमारे ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

मध्यरात्रीच्या छाप्यात ‘तिरट’चा जुगार रंगात; ९ जण पोलिसांच्या जाळ्यात
शिर्डी पोलीस स्टेशनच्या पथकाने सावळीविहीर (ता. राहाता) येथील शिवारात गट क्रमांक ४२ मधील पत्र्याच्या शेडवर मध्यरात्री धाड टाकून मोठा जुगार अड्डा उद्ध्वस्त केला. महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम ४, ५ व १२(३) अन्वये ९ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सुमारे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कोकमठाण येथील ९ आरोपींविरुद्ध गुन्हा

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


या प्रकरणातील आरोपींमध्ये उत्तम कचेश्वर रक्ताटे (४७), रमेश भिमराज मगर (५७), कैलास जयराम लोंढे (५७), रामदास मारुती रक्ताटे (६१), भास्कर विश्वनाथ रोहम (५८), भिमराज भाऊसाहेब घोरपडे (४५), चंद्रभान भिमराज फटांगरे (४७), प्रभाकर सुखदेव निकम (६९) आणि भाऊसाहेब कचेश्वर जपे (५५) यांचा समावेश आहे. सर्व आरोपी हे जंगली महाराज आश्रमामागे, कोकमठाण (ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर) येथील रहिवासी आहेत.


जागामालकाच्या ठिकाणी सुरू होता हार-जीतीचा फड
पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी क्रमांक १ ते ८ हे आरोपी क्रमांक ९ भाऊसाहेब जपे यांच्या जागेत ५२ पत्त्यावरील ‘तिरट’ नावाचा हार-जीतीचा जुगार खेळत होते. माहितीची खातरजमा झाल्यानंतर पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकला आणि सर्वांना रंगेहाथ पकडले.
जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा वचक; परिसरात खळबळ
या कारवाईत पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, पोलीस उपनिरीक्षक सागर काळे, निवांत जाधव आणि इतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. ग्रामीण भागात शेतजमिनी व एकांतस्थळी सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्याने जुगार व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button