Letest News
ड्रेनेजची तक्रार केली म्हणून महिलेवर हात उचलला! लाथाबुक्क्यांनी मारहाण दगडाने डोके फोडले ‘कुटुंबाला... शिर्डीत भक्तिमय वातावरणात श्री गोकुळाष्टमी उत्सव उत्साहात अनाथ बालकांसोबत ‘दबंग’ अधिकाऱ्याचा वाढदिवस!कायदा-सुव्यवस्थेत कणखर भूमिका सामाजिक जाणीवेतही तितकीच सं... मध्यस्थीची भावना जुनी आधुनिक स्वरूप अधिक परिणामकारक! — न्या. शिवाजी कचरे प्रमुख जिल्हा व सत्र न्याया... कडक शिस्तीच्या अधिकाऱ्याला सर्वपक्षीय सलाम! अमोल मोरे यांची प्रांताधिकारीपदी पदोन्नती सापडलेला लाखाचा मोबाईल साईभक्ताला परत संस्थान कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाला सलाम! निर्व्यसनी तरुणाईची एकजूट ढोल-ताशांच्या गजरात रंगणार गोविंदांचा जल्लोष शिर्डीच्या साईदरबारी भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा गोकुळाष्टमीनिमित्त साईचरणी सोन्याचा ब्रोच अर्पण भगवान थोरात यांची ग्राहक संरक्षण समितीच्या राहाता तालुका प्रवक्तेपदी नियुक्ती
अ.नगरराजकीय

महावितरणचा अनागोंदी कारभार, ग्राहकांच्या मुळावर सामाजिक कार्यकर्ते शरद तांबे

राहुरी / प्रतिनिधी :  अहिल्यानगर जिल्ह्यात महावितरण कंपनीच्या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कारणही तसेच आहे. वीज माणसांच्या मुलभूत गरजापैकी बनली आहे. मात्र महावितरणचा अनेकदा भोंगळ कारभार नेहमीच दिसला आहे वीजेचे बिल नेहमीप्रमाणे उशीरा येते व ग्राहकांना दंडाचा फटका बसतो आहे. यावर सामाजिक कार्यकर्ते शरद तांबे यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. 

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


  महावितरणची आधीच उशिरा विज बिले त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून ग्राहक आणि व्यावसायिकांना वितरित झाले मात्र बिले प्राप्त होताच दुसऱ्याच दिवशी त्यावर अंतिम दिनांक असल्याने विनाकारण ग्राहकांना दंडाचा भुर्दंड दंड भरावा लागत आहे.  
   गत महिन्याची वीज बिले महावितरण कंपनीकडून पाच दिवस उशिरा दिले लागोलग वीज देयकाचा अंतिम दिनांक असल्याने ग्राहकांना हा दंडाचा भुर्दंड नाहक  होताना दिसतोय.

नेहमीच अनेक ‌कारणे आणि जुजबी कारणे दाखवून ग्राहकांना लुबाडणाऱ्या महावितरण  कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले आहे. त्यांच्या निष्काळजी पणामुळेच हा दंड वीजग्राहकांना विनाकारण भरावा लागत आला आहे. 

या उशीराच्या पाच दिवसांचा हिशेब केला तर यातून दंडाचे लाखो रुपये जमा होतात हा एक प्रकारचा ‌अतिरिक्त ‌चार्ज आहे का? असा प्रश्न प्रवरानगर येथील सामाजिक कार्यकर्ते शरद तांबे यांनी उपस्थित केला आहे. या प्रश्नी महावितरण प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारणार असल्याचे शरद तांबे यांनी सांगितले आहे. 

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button