Letest News
राहाता तालुक्यातील एकरूखे येथे सरकारी वकिलाच्या घरी धाडसी दरोडा- १.५१ लाखांचा ऐवज लुटून चार दरोडेखोर... साईबाबांवर हात ठेवून शपथ घ्या- टक्केवारी कोणी मागितली?निलेश लंके यांचा विखेंवर घणाघात मंदिर परिसरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाटइशारा देऊनही संस्थान-नगरपरिषद सुस्त अखेर साईभक्त महिलेवर कु... पती बेपत्ता म्हणून पत्नीची पोलिसांत तक्रार शोध घेताना समोर आला धक्कादायक प्रकार! पत्नीच्या नावाने रू... पैशांसाठी विवाहितेचा छळ चारित्र्यावर संशय घेत मारहाण‘गाडी घेण्यासाठी माहेरून पैसे आण नाहीतर जिवंत सो... ओबीसी मोर्चाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुखपदी बाळासाहेब गाडेकर शिर्डीत साईबाबांच्या धुपारतीच्या वेळेत बदल श्रावण सोमवारी सायंकाळी ६ वाजताच धुपारती चक्क भरदिवसा किराणा दुकानाचा गल्ला साफ! दान करायला आले अन् सोन्याची पोत घेऊन पसार!शिर्डीत महिलेची हातचलाखीने फसवणूक ४० हजारांचे सोने लंपास NH-160 च्या निकृष्ट कामावर पिपाडांचा हल्लाबोल!ठेकेदार सल्लागार एजन्सी व दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाख...
अ.नगरक्राईम

सैफ हल्लाप्रकरणी आरोपी पोलिसांच्या ताब्यात?

सैफ अली खानवर त्याच्याच घरात घुसून जीवघेणा हल्ला करण्यात आला. यामध्ये सैफ गंभीर जखमी झाला, त्यानंतर त्याला तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर असून त्याला आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या निगरानी ठेवण्यात आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतल्याची मोठी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या व्यक्तीला कुठून आणि कसं ताब्यात घेतलं याबाबत सध्या कुठलीही माहिती नाही.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

पोलीस या ताब्यात घेतलेल्या व्यक्तीला वांद्रे पोलीस ठाण्यात आणणार असल्याची माहिती आहे. सध्या पोलीस याप्रकरणी तपास करत असून आरोपीला अटकेत घेतल्यानंतर पुढील माहिती देण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. चोरटा हा चोरीच्या उद्देशानेच सैफ अली खानच्या घरात शिरला होता. तो लोकलने वांद्रे येथे आला.

त्यानंतर त्याने सैफ अली खानच्या इमारती जवळच्या दुसऱ्या इमारतीवरुन उडी घेत सतगुरु शरण इमारतीत प्रवेश घेतला. त्याने मागच्या गेटने प्रवेश केल्याची माहिती आहे. तर, सैफ अली खानच्या घरापर्यंत जाण्यासाठी त्याने इमारतीच्या इमर्जन्सी पायऱ्यांचा वापर केल्याची माहिती आहे.

पोलिसांना आतापर्यंतच्या तपासात अनेक पुरावे सापडले आहेत. त्याआधारे पोलिसांनी या आरोपीचं लोकेशनही ट्रेस केल्याची माहिती आहे. हा चोरटा मुंबईतील प्रभादेवी या भागात राहत असल्याची माहिती आहे. त्यानुसार, पोलिसांनी तपास करत चोरट्याला ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल बोलताना आता नुकताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिसले आहेत. देवेंद्र फडणवीस हे म्हणाले की, या घटनेबद्दलची सर्व माहिती पोलिसांनी दिली आहे. हा हल्ला कोणत्या प्रकारचा आहे, याचीही माहिती दिलीये. मुंबई असुरक्षित आहे असे म्हणणे चुकीचे असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर मुंबई असुरक्षित असल्याचा आरोपी अनेक राजकीय मंडळींनी केला.

माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण किंवा अभिनेता सलमान खान याला मिळणाऱ्या धमक्यांच्या प्रकरणाला सैफ अली खानवरील हल्ल्याशी जोडण्याचा काही संबंध नाही. जी माहिती मिळाली, त्यानुसार तो भुरटा चोरच होता. हल्ला कशा पद्धतीने झाला, हे लवकरच समेजल. चोराचा चेहरा समोर आलेला आहे, त्यामुळे त्याला लवकरच पकडण्यात येईल, असं योगेश कदम म्हणाले.

लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांच्या चमूने त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. लिलावती रुग्णालयात न्यूरोसर्जरी आणि प्लॅस्टिक सर्जरीची शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी सैफच्या मणक्यात चाकूचा तुकडा अडकला होता. तो देखील डॉक्टरांनी यशस्वीरित्या काढला असून सध्या सैफची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button