Letest News
दानशूर उद्योगपती अनंत अंबानी यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा “छेडछाड केल्यास थेट कारवाई!” – ‘शी-बॉक्स’ पोर्टल अधिक कडक मयत दिवटे प्रकरणात अप्पर पोलीस अधीक्षक वाकचौरे यांचा संकेत – फेरतपासाची शक्यता “राहता मटन मार्केटमध्ये संतापजनक प्रकार-मेलेल्या बोकडाचे मटन विक्री- दुकानदारावर कारवाईचा बडगा!” दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांची डॉ. राजेंद्र पिपाडा यांच्याशी भेट-बजरंगबलीची मूर्ती देऊन सत्कार शिर्डी ते पनवेल … फसवणुकीचा खेळ उघड! 50 हजारांच्या झोपडपट्टीत घुसून शिर्डी पोलिसाने केला आरोपीचा ‘गे... “भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा मोठा स्फोट; SIT च्या पहिल्याच पत्रकार परिषदेत धक्कादायक खुलासे!” कल्पना खरातचा अटकपूर्व जामिनासाठी धाव- 10 एप्रिलला राहता न्यायालयात सुनावणी साई दरबारातच हात साफ! गर्दीचा फायदा घेऊन 1.25 लाखांचे दागिने लंपास — भाविकांमध्ये संताप “भोंदूगिरीवर राज्यसभेत आवाज!” — खासदार वाघमारे आक्रमक ‘कॅप्टन’ अशोक खरातवर कडक कारवाईची मागणी
राजकीय

मतदारांनी मतदान केंद्रात मोबाईलचा वापर टाळावा शिर्डी लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी यांचे आवाहन

शिर्डी,

sai nirman
जाहिरात

शिर्डी लोकसभा मतदारसंघात सोमवार १३ मे रोजी मतदान होत असून सर्व घटकातील पात्र मतदारांनी आपली जबाबदारी, कर्तव्य समजून या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मतदान करावे;

DN SPORTS

मात्र मतदानाला जातांना मतदान केंद्रात मोबाईलचा वापर टाळावा, असे आवाहन शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी केले आहे.

kamlakar

मतदानाच्या दिवशी पहाटे ५.३० वाजता उमेदवारांच्या मतदान प्रतिनिधींच्या उपस्थित मॉक पोल घेण्यात येणार आहे. यावेळी उमेदवारांचे मतदान प्रतिनिधी ही उपस्थितीत राहणार आहेत. मतदानाची वेळ सकाळी ७.०० वाजता ते सायंकाळी ६.०० वाजेदरम्यान राहणार आहे.

मतदान केंद्रांवर उमेदवारांच्या प्रतिनिधींना मोबाईल वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. तर मतदारांनीही मतदान केंद्रावर जातांना मोबाईलचा वापर टाळावा. मतदानाचे फोटो, व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल होऊन गोपनीयतेचा भंग होऊ नये,

यासाठी मतदान केंद्रात मतदारांनी मोबाईलचा वापर टाळावा. मतदारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता येत्या १३ मे रोजी आपला मताचा पवित्र हक्क बजावून लोकशाहीच्या सक्षमीकरणात योगदान द्यावे, असे आवाहनही श्री. कोळेकर यांनी केले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button