Letest News
चिन्नाराव हॉटेल प्रकरणाने शिर्डीत खळबळ आता शिर्डी नगर परिषद कारवाई करणार का? रक्षाबंधनाचा स्नेहसोहळा शिर्डीत उत्साहात- महिलांनी सुजय विखे यांच्या हातावर बांधली राखी बनावट नंबरच्या बेवारस दुचाकीचा छडा- साई संस्थानच्या सुरक्षा विभागाने शोधला मूळ मालक महाराष्ट्रात तुकाराम मुंडे… तर तेलंगणात वैभव गायकवाड! अहिल्यानगरच्या भूमिपुत्राच्या धडक कारवाईने गुन... पत्रकारितेतील चार दशकांचा प्रदीर्घ प्रवास- असंख्य पत्रकारांचे मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख... “राधाकृष्ण विखेंना हटवा…” जरांगेंच्या निर्णायक आंदोलनापूर्वीच मुख्यमंत्र्यांना थेट पत्र! संघर्षाच्या वाटेवरून यशाची पहिली पायरी चढला गौरव लोकचंदानी-बार कौन्सिलची सनद मिळवत वकिलीच्या नव्या प... शिर्डीतील ‘चिन्नाराव’ हॉटेलच्या जेवणात झुरळ? फोटो समोर येताच खळबळ! “विखे पाटलांना काहीच कळत नाही त्यांना फक्त साखर कारखानाच कळतो!” – मनोज जरांगे पाटील तालुक्याला दोन आमदार पण एकही नाही दमदार!रस्त्यांच्या खड्ड्यांनी हैराण कोपरगावकरांचा संताप फलकावर
अ.नगरक्राईम

गावठी कट्टा व जिवंत काडतुस बाळगणारा इसम घेतला ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

सोमनाथ घार्गे साहेब, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी पोनि/श्री. किरणकुमार कबाडी स्थागुशा अहिल्यानगर यांना जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे बाळगणा-या इसमांविरुध्द जास्तीत जास्त कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये स्थागुशा पथक जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे या बाबत माहिती घेताना दिनांक 04/09/2025 रोजी पेनि/श्री. किरणकुमार कबाडी यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

इसम नामे संदिप बंडु मरकड रा. बटेवाडी, ता.जामखेड हा त्याचे कब्जामध्ये विनापरवाना गावठी कट्टा व काडतुस बाळगुन जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे बटेवाडी, ता.जामखेड येथे उभा आहे, आता गेल्यास मिळुन येईल. अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने, पोनि/श्री. किरणकुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई/अनंत सालगुडे, सफौ/रमेश गांगर्डे, पोहेकॉ/हदय घोडके, पोना/शामसुंदर जाधव अशांचे पथक नेमुन पंचाना सोबत घेवुन,

बातमीतील संशयीताची माहिती घेवुन तो मिळुन आल्यास त्यास ताब्यात घेवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.
पोलीस पथकाने दिनांक 04/09/2025 रोजी जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे बटेवाडी, ता.जामखेड येथे जावुन खात्री करता बातमीतील वर्णनाप्रमाणे एक संशयीत इसम मिळुन आला.

त्यास शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयीतास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव संदिप बंडु मारकड वय-21 वर्षे रा.बटेवाडी, ता.जामखेड असे असल्याचे सांगितले. त्यास दोन पंचासमक्ष गावठी कट्टा व जिवंत काडतुस बाबत विचारपुस करता त्यांनी लपवुन ठेवलेले 35,000/- रुपये किंमतीचा एक देशी बनावटीचा कट्टा

व 1,000/- रुपये किंमतीचे 1 जिवंत काडतुस असा एकुण 36,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला आहे.
ताब्यातील आरोपी याचेविरुध्द पोकॉ/2574 मनोज मोहन साखरे नेम. स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचे फिर्यादीवरुन जामखेड पोलीस स्टेशन गु.र.नं. 497/2025 आर्म ऍ़क्ट 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी नामे संदिप बंडु मारकड वय-21 वर्षे रा.बटेवाडी, ता.जामखेड आणि एक गावठी कट्टा व एक काडतुस असा एकुण 36,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जामखेड पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आला असुन, पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशन हे करीत आहे.


सदरची कारवाई श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button