Letest News
शिर्डी पोलिसांचा अ‍ॅक्टिव्ह मोड चैन स्नॅचिंग करणाऱ्या सराईत दोघांना जेरबंद रात्रीच्या अंधारात मातीची ‘चोरी’! पोलिसांचा डंपरवर घाला पुणतांबा शिवारात ६ ब्रास गौण खनिजाची बेकायदा... गणपती मंडळासमोर राडा! दांडके फायटर अन् लोखंडी रॉडने मारहाणीचा आरोप साकुरी शिवमध्ये मोटारसायकलच्या धक... रंजल्या-गांजल्यांच्या आधारासाठी दानशूर पंकज लोढांचा पुढाकार स्नेहालयासाठी ११ गुंठे जमीन देणगी सन्मित्र युवक मंडळाचा ६२ वा गणेश याग आजपासून कर्तव्यावर सापडली सोन्याची अंगठी पुजाऱ्याने दाखविली प्रामाणिकता ३४ वर्षांची परंपरा कायम डीजेला फाटा देत क्रांती युवक मंडळाचा भक्तिमय गणेशोत्सव! साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल
क्राईमशिर्डी

शिर्डीत रिक्षातून वृद्धाची लूट सराईत गुन्हेगार रहीम पठाणसह दोघांना २ दिवसांची पोलीस कोठडी

शिर्डी, प्रतिनिधी : शिर्डीतील साई फेज-२ परिसरात रिक्षातून प्रवास करणाऱ्या ७५ वर्षीय वृद्धाला मारहाण करून त्याच्याकडील रोख रक्कम लुटल्याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी सराईत गुन्हेगार रहीम पठाणसह तिघांना अटक केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
फिर्यादी विश्वनाथ लिंबा मैद (वय ७५, रा. मैदवाडी, ता. धारूर, जि. बीड) हे आपल्या नातू अंकुश अशोक मैद याच्यासोबत उपचारासाठी शिर्डीत आले होते. ३ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ९.३० वाजता ते श्री साईनाथ रुग्णालयाजवळून साई फेज-२ येथे जाण्यासाठी रिक्षात बसले. रिक्षात आधीच तीन जण बसलेले होते. रिक्षाचालकाने “पुढील स्टॉपवर उतरतील” असे सांगून त्यांना बसविले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


मात्र, रिक्षा सुरू झाल्यानंतर त्या तिघांनी वृद्ध व त्यांच्या नातवाला मारहाण करण्यास सुरुवात केली. विश्वनाथ मैद यांच्या हातातील पिशवी हिसकावून त्यातील ७,२०० रुपये रोख जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर दोघांना रिक्षातून खाली उतरवून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ६८०/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०८(६) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


तपासादरम्यान पोलिसांनी सराईत गुन्हेगार रहीम पठाण याच्यासह अन्य दोन आरोपींना अटक केली. तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पुढील तपासासाठी दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. या गुन्ह्यात आणखी काही आरोपींचा सहभाग आहे का, तसेच अशाच प्रकारच्या इतर घटनांशी या टोळीचा संबंध आहे का, याचा तपास शिर्डी पोलीस करीत आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button