Letest News
साईबाबांविरोधातील वक्तव्यावर गौतम खट्टर नमले-राहाता न्यायालयात चूक मान्य-यापुढे आक्षेपार्ह भाष्य करण... घरासमोरच उघडपणे सुरू होता लाखोंच्या उलाढालीचा जुगार अड्डा-स्थानिक गुन्हे शाखेच्या धाडीत रोख रक्कम-मो... दिव्यांगावर दहशत! मारहाण-शिवीगाळ-मोबाईलची तोडफोड- सचिन भैरवकर आरोपीवर गंभीर गुन्हा दाखल सावळी विहीरच्या दूध संकलन केंद्रावर एफडीएची धडक कारवाई-परवाना तात्काळ निलंबित साईबाबा रुग्णालयातील स्टाफ नर्स विरुद्ध ७.९० लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा शिर्डीत ५५ सभासदांच्या मालमत्तेवर न्यायालयाचा 'ब्रेक' २७.९८ लाखांच्या थकबाकीप्रकरणी विक्री-हस्तांतरण... शिर्डी विविध कार्यकारी सोसायटीचे १ हजार मेट्रिक टन क्षमतेचे अन्नसुरक्षा भांडारचे काम प्रगतीपथावर शिर्डीत ३२ व्या श्री साईसच्चरित पारायण सोहळ्याची तयारी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात शिर्डीत १५ वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या श्रीरामनगर परिसर हादरला साईदर्शनासाठी आलेल्या चार वर्षीय चिमुकलीचा शिर्डीत भीषण अपघातात मृत्यू-साईनगरी हळहळली
राजकीयशिर्डी

शिवसेना वर्धापन दिन उत्साहात-शिर्डीत शिवसैनिकांचा जल्लोष साई समाधीवर फुलांची चादर अर्पण करत शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा

शिर्डी प्रतिनिधी : शिवसेना पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त शिर्डी येथे आयोजित करण्यात आलेला भव्य जल्लोष सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेत समाधीवर फुलांची चादर अर्पण करून पक्षाच्या वाटचालीसाठी आशीर्वाद घेतले.
शिर्डी येथील सिटी हार्ट हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यास संगमनेरचे आमदार मा. अमोल खताळ पाटील, नेवासाचे आमदार मा. विठ्ठलराव लंघे, माजी खासदार मा. सदाशिव लोखंडे, माजी आमदार मा. भानुदास मुरकुटे, माजी आमदार मा. भाऊसाहेब कांबळे, मा. सागर भैय्या बेग यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पक्षाच्या गौरवशाली इतिहासाचा आढावा घेण्यात आला. संघटना बळकटीकरण, आगामी राजकीय वाटचाल आणि जनतेच्या प्रश्नांवर प्रभावीपणे लढा उभारण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन मान्यवरांनी केले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सहाही तालुक्यांमधून शिवसैनिक, महिला आघाडी, युवासेना तसेच विविध अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. घोषणाबाजी आणि जल्लोषाने परिसर दणाणून गेला. यामुळे शिवसेनेची ताकद, एकजूट आणि पक्षनिष्ठा पुन्हा एकदा अधोरेखित झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे व सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा सोहळा शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा आणि संघटनात्मक बळ वाढविणारा ठरला.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button