Letest News
चिन्नाराव हॉटेल प्रकरणाने शिर्डीत खळबळ आता शिर्डी नगर परिषद कारवाई करणार का? रक्षाबंधनाचा स्नेहसोहळा शिर्डीत उत्साहात- महिलांनी सुजय विखे यांच्या हातावर बांधली राखी बनावट नंबरच्या बेवारस दुचाकीचा छडा- साई संस्थानच्या सुरक्षा विभागाने शोधला मूळ मालक महाराष्ट्रात तुकाराम मुंडे… तर तेलंगणात वैभव गायकवाड! अहिल्यानगरच्या भूमिपुत्राच्या धडक कारवाईने गुन... पत्रकारितेतील चार दशकांचा प्रदीर्घ प्रवास- असंख्य पत्रकारांचे मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख... “राधाकृष्ण विखेंना हटवा…” जरांगेंच्या निर्णायक आंदोलनापूर्वीच मुख्यमंत्र्यांना थेट पत्र! संघर्षाच्या वाटेवरून यशाची पहिली पायरी चढला गौरव लोकचंदानी-बार कौन्सिलची सनद मिळवत वकिलीच्या नव्या प... शिर्डीतील ‘चिन्नाराव’ हॉटेलच्या जेवणात झुरळ? फोटो समोर येताच खळबळ! “विखे पाटलांना काहीच कळत नाही त्यांना फक्त साखर कारखानाच कळतो!” – मनोज जरांगे पाटील तालुक्याला दोन आमदार पण एकही नाही दमदार!रस्त्यांच्या खड्ड्यांनी हैराण कोपरगावकरांचा संताप फलकावर
क्राईमशिर्डी

शिर्डीत धारदार शस्त्र बाळगल्याने दोन आरोपींवर गुन्हा दाखल!

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी येथे दोन जणांना हत्यारे जवळ बाळगल्यामुळे हत्यारा सह पोलिसांनी ताब्यात घेतले या संदर्भात अधिक माहिती अशी की, पोलीस कॉन्स्टेबल विकी त्रिभुवन यांनी शिर्डी पोलीस स्टेशन येथे सरकारमार्फत फिर्याद दिली की,

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

दि.07/06//2025 रोजी डयुटीवर असताना वरिष्ठांच्या आदेशाने पोसई जाधव, मी पोना/2044 किरण माळी, पोकों/सतपाल शिंदे पोकों/आकाश चव्हाण, असे सर्वाना रेकॉर्ड वरील गुन्हेगार चेकींग करण्याबाबत आदेशीत करण्यात आले होते. तेव्हा वरील आम्ही सर्वजण तशी स्टे.डा. नोंद क्रमांक 20/2025 अन्वये पोलीस स्टेशन हददीत रवाना झालो होतो.


गुन्हेगार चेकींग करीत असताना पोना/2044 माळी यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, साई व्दारकामाई पार्किंग जवळील असलेल्या महादेव मंदिराच्या ठिकाणी एका पत्रयाचे शेड मध्ये दोन मुले राहत असुन त्यांच्याकडे धारदार शस्त्रे बाळगुन असल्याचे माहिती मिळाली. तेव्हा 16/35 वा. पोना/माळी यांनी दोन पंचाना बोलावुन घेवुन त्यांना मिळालेल्या माहिती बाबत सांगितले.

त्यानंतर साई व्दारकामाई पार्कीग येथे दुचाकीवर जावुन त्या ठिकाणी गाड्या उभ्या करून पायी चालत आम्ही पंचासह महादेवाच्या मंदिराजवळ गेलो. तेथे शेजारीच असलेल्या पत्रयाच्या शेडमध्ये दोन इसम झोपलेले मिळून आले. तेव्हा आम्हा पंचासमक्ष पोलीसांनी त्यांची ओळख सांगुन आम्हा पंचांची ओळख करून दिली.

तसेच त्यांना आम्हा सर्वांची अंगझडती घेण्यास नकार दिला. तेव्हा पोलीसांनी आम्हा पंचासमक्ष पत्रयाच्या शेडमध्ये झडती घेतली असता कोपर-यात असलेल्या पेटीच्या पाठीमागे एक धारदार शस्त्र मिळून आले. तेव्हा आम्हा पंचासमक्ष पोलीसांनी त्या दोघांचे नाव गाव विचारता त्या दोघांनी त्यांचे नाव

।) सोमनाथ विजयकुमार बिरादार वय 30 वर्षे रा.लोहारा ता. उदगीर जि. लातुर व 2) विकास कैलास शेजवळ वय 27 वर्षे रा.जुना बिरोबा रोड भिमनगर शिर्डी असे सांगितले. त्यांच्याकडून


दोन्ही बाजुस धारदार असलेल्या तसेच अंकुचीदार सुरापात्याची लांबी 14 इंच, लोखंडी मुठ 6 इंच अशी एकूण 20 इंच लांबीचा लोखंडी सुरा ताब्यात घेवुन त्यांचे विरुध्द भारतीय हत्यार कायदा कलम-4/25 प्रमाणे फिर्याद दाखल केली असून त्यानुसार शिर्डी पोलीस ठाण्यात या दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शिर्डी पोलीस करत आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button