Letest News
शिर्डीत हरवलेला ‘आयफोन’ साईभक्तेला परत शिर्डी पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी साईचरित्र पारायणाची भक्तिमय सांगता आज सायंकाळी शिर्डीत पोथीची भव्य मिरवणूक साईचरणी कोते-गोंदकर परिवाराची श्रद्धेची लाखमोलाची ओंजळ!श्री साईचरित्र पारायण सोहळ्यासाठी दोन्ही परिव... विद्यमान खासदार नीलेश लंके यांचा माजी खासदार सुजय विखेंवर नावानिशी हल्लाबोल ‘डोनाल्ड ट्रम्पला स्वियस... साईभक्तांची लूट थांबवणार कोण? वाहतूक शाखेचे ‘अतिकर्तव्यदक्ष’ अधिकारी येसेकर नामदार विखेंच्या आदेशाची... चिक्की-बिस्किटांच्या नावाखाली गुटखा विक्रीचा आरोप पोलिसांनी तातडीने कारवाई करावी शिर्डीतील गुटखा तस्करीचा सूत्रधार कोण? १२ आरोपींनंतर आता ‘आका’पर्यंत पोलिसांचा तपास पोहोचणार का? गुटख्याच्या काळ्या बाजाराला एलसीबीचा दणका! तिघांना न्यायालयात हजर करताच एक दिवसाची पोलीस कोठडी पुरवठ... डॉ. सुजय विखेंचा मेंदू खराब झाला’- रोहित पवारांचा बोचरा पलटवार उदयपूर ते शिर्डी सातवी पदयात्रा भक्तिभावात पूर्ण- साईभक्त मोहित आचार्य यांचे शिर्डीत आगमन
क्राईमशिर्डी

शिर्डीतील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नगरातील रहिवाशांना न्यायालयाचा सात दिवसासाठी जैसे थे चा आदेश!

शिर्डी( प्रतिनिधी) शिर्डी नगर परिषदेच्या वतीने येथील (गावठाण )मधील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगरातील रहिवाशांना आपण राहत असलेली घरे निष्काशीमत करावी . अन्यथा नगरपरिषद ती निष्काशीत करेल. म्हणून नोटीस दिली आहे.यावर येथील रहिवाशांनी माननीय न्यायालयामध्ये धाव घेतली असून न्यायालयात सुनावणीहून सात दिवसासाठी जैसे थे चा आदेश दिला आहे. त्यामुळे अण्णाभाऊ साठे नगरातील रहिवाशांना धीर मिळाला आहे. अशी माहिती अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष समीर रामचंद्र वीर यांनी दिली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


शिर्डी मधील अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवाशी अनेक वर्षापासून येथे राहतात. नळपट्टी, घरपट्टी, पाणीपट्टीही भरतात. येथे राहणारे सर्व मागासवर्गीय व गोरगरीब आहेत. मात्र शिर्डी नगर परिषदेने अण्णाभाऊ साठे नगरातील रहिवाशांना राहत असलेल्या जागा खाली कराव्यात. अन्यथा नगरपरिषदेत येथील ही घरे निष्काशीत करेल. अशी लेखी नोटीस दिली आहे. त्यामुळे येथील रहिवाशांमध्ये मोठी तारांबळ उडाली असून आता कुठे जायचे असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

त्यामुळे येथील रहिवाशांनी माननीय न्यायालयात धाव घेतली. माननीय न्यायालयाने दावा दाखल करून घेतला व त्यावर सुनावणी झाल्यानंतर शिर्डीतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगरातील परिस्थिती सात दिवसासाठी जैसे थे चा आदेश माननीय न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे काही दिवसांसाठी तरी अण्णाभाऊ साठे नगरातील रहिवाशांना मोठा आधार आला आहे. असे समीर रामचंद्र वीर यांनी सांगितले असून यापुढे आमचा लढा सुरूच राहणार आहे.

न्यायालयावर आमचा विश्वास आहे. तेवढाच विश्वास आमचा विखे कुटुंबावर स्वर्गीय बाळासाहेब विखे नामदार राधाकृष्ण विखे व खासदार संजय दादा विखे विखे परिवाराचं मागासवर्गीय समाजावर अत्यंत प्रेम आहे ते राहणारच म्हणूनच नामदार राधाकृष्ण विखे व खासदार सुजय दादा पाटील यांना एकच विनंती आहे एक तर आमचे पुनर्वसन करा, नाहीतर आम्हाला आहे तेथेच राहू द्या, अशी मागणीही अण्णाभाऊ साठे नगरातील सर्व रहिवाशांच्या वतीने आम्ही करत आहोत. असेही त्यांनी सांगितले.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button