Letest News
ड्रेनेजची तक्रार केली म्हणून महिलेवर हात उचलला! लाथाबुक्क्यांनी मारहाण दगडाने डोके फोडले ‘कुटुंबाला... शिर्डीत भक्तिमय वातावरणात श्री गोकुळाष्टमी उत्सव उत्साहात अनाथ बालकांसोबत ‘दबंग’ अधिकाऱ्याचा वाढदिवस!कायदा-सुव्यवस्थेत कणखर भूमिका सामाजिक जाणीवेतही तितकीच सं... मध्यस्थीची भावना जुनी आधुनिक स्वरूप अधिक परिणामकारक! — न्या. शिवाजी कचरे प्रमुख जिल्हा व सत्र न्याया... कडक शिस्तीच्या अधिकाऱ्याला सर्वपक्षीय सलाम! अमोल मोरे यांची प्रांताधिकारीपदी पदोन्नती सापडलेला लाखाचा मोबाईल साईभक्ताला परत संस्थान कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाला सलाम! निर्व्यसनी तरुणाईची एकजूट ढोल-ताशांच्या गजरात रंगणार गोविंदांचा जल्लोष शिर्डीच्या साईदरबारी भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा गोकुळाष्टमीनिमित्त साईचरणी सोन्याचा ब्रोच अर्पण भगवान थोरात यांची ग्राहक संरक्षण समितीच्या राहाता तालुका प्रवक्तेपदी नियुक्ती
Blog

साईभक्तांना झाले साई बाबांच्या लीलेचे दर्शन भक्ताने विसरलेले सोने मिळाले परत भक्ताने मानले आभार

आज दिनांक 06/04/2024 रोजी गुंटूर, आंध्रप्रदेश येथील साईभक्त के. राजेंद्र श्रीनिवास हे साईबाबा दर्शनाकरिता आलेले होते. ते एक हजार रूम भक्तनिवास येथे कुटुंबासह राहणेस होते. आज सकाळी ते 08:30 वाजता शनी शिंगणापूर येथे दर्शनाला गेले असता त्यांचे लक्षात आले कि,

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

हातात घालायची सुमारे 20 ग्राम वजनाची सोन्याची बांगडी एक लाख चौतीस हजार रु किमतीची भक्तनिवास येथे रूम किंवा बाहेर कुठेतरी विसरले आहेत.

kamlakar

त्यांनी फोन करून सुरक्षा अधिकारी यांना कळविले, साईबाबा संस्थान चे सुरक्षा रक्षक श्री. प्रवीण भागवत हे तात्काळ त्यांचे रूम मध्ये गेले त्यावेळी तेथे साफ सफाईची काम चालू होते. तेथील सर्व कर्मचारी बोलावून घेऊन त्यांनी ती सोन्याची बांगडी शोधून ऑफिस येऊन जमा केली.

शनी शिंगणापूर वरून साईभक्त आल्यानंतर त्यांची ओळख पटवून सुमारे 1,34,000/- रु किमतीची बांगडी साईभक्ताला परत दिली. त्यावेळी भक्त अतिशय भावुक झाले आणि शिर्डीत साईबाबांची लीला पाहून साईबाबांवरील श्रद्धा अधिक दृढ झाली.

सुरक्षा रक्षक श्री प्रवीण भागवत यांच्या या चांगल्या कामाबद्दल श्री साईबाबा संस्थान चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. तुकाराम हुलवले यांनी शाबासकी दिली. सदर प्रामाणिक कर्मचारी श्री प्रवीण भागवत यांना संरक्षण ऑफिस ला बोलावून घेऊन त्यांचा यथोचित सन्मान केला.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button