Letest News
चिन्नाराव हॉटेल प्रकरणाने शिर्डीत खळबळ आता शिर्डी नगर परिषद कारवाई करणार का? रक्षाबंधनाचा स्नेहसोहळा शिर्डीत उत्साहात- महिलांनी सुजय विखे यांच्या हातावर बांधली राखी बनावट नंबरच्या बेवारस दुचाकीचा छडा- साई संस्थानच्या सुरक्षा विभागाने शोधला मूळ मालक महाराष्ट्रात तुकाराम मुंडे… तर तेलंगणात वैभव गायकवाड! अहिल्यानगरच्या भूमिपुत्राच्या धडक कारवाईने गुन... पत्रकारितेतील चार दशकांचा प्रदीर्घ प्रवास- असंख्य पत्रकारांचे मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख... “राधाकृष्ण विखेंना हटवा…” जरांगेंच्या निर्णायक आंदोलनापूर्वीच मुख्यमंत्र्यांना थेट पत्र! संघर्षाच्या वाटेवरून यशाची पहिली पायरी चढला गौरव लोकचंदानी-बार कौन्सिलची सनद मिळवत वकिलीच्या नव्या प... शिर्डीतील ‘चिन्नाराव’ हॉटेलच्या जेवणात झुरळ? फोटो समोर येताच खळबळ! “विखे पाटलांना काहीच कळत नाही त्यांना फक्त साखर कारखानाच कळतो!” – मनोज जरांगे पाटील तालुक्याला दोन आमदार पण एकही नाही दमदार!रस्त्यांच्या खड्ड्यांनी हैराण कोपरगावकरांचा संताप फलकावर
क्राईमशिर्डी

मोटरसायकलचा धक्का लागल्याचे निमित्त अन् तरुणास काठीने झोडपत जीवे मारण्याची धमकीशिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

शिर्डी शहरात गेल्या दोन महिन्यांपासून भाविकांची संख्या रोडावली असून व्यावसायिक मेटाकुटीला आले असताना काही गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी व्यावसायिकांना लक्ष्य करत कधी चाकू तर कधी कोयत्याने हल्ला करत आपली दहशत निर्माण केली आहे

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

अश्याच एका प्रकरणात राहता येथील गणेश रामदास आरणे या तरुणाने शिर्डी पोलिसात फिर्याद दिली असून दिनांक 20 मे रोजी दुपारी पावणे चारच्या सुमारास फिर्यादी गणेश हा कामानिमित्त कोते गल्ली येथून पायी चालला असता फिर्यादी गणेश यास पाठीमागून मोटरसायकलचा धक्का लागल्याने नीट चालता येत नाही.

kamlakar

का असे म्हटल्याचा राग येऊन आरोपीने फिर्यादीस मला तू ओळखतो का असे म्हणत शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व रस्त्याच्या कडेला पडलेल्या लाकडी काठीने फिर्यादीच्या तोंडावर व डोक्यात मारहाण करून डोक्याला जखम केली.

या मारहाणीत फिर्यादी गणेश यांच्या ओठास व दाताला जखम झाली असून आरोपीने फिर्यादी गणेश यास परत आमच्या नादी लागला तर जीवे मारून टाकण्याची धमकी दिल्याने गणेश रामदास आरणे यांनी नांदुरखी येथील अमोल त्रिभुवन याच्या विरोधात शिर्डी पोलिस स्टेशनला जात

गुन्हा रजिस्टर नंबर 321/2024 नुसार भादवी कलम 324,323,504,506 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल गायकवाड अधिक तपास करीत आहेत

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button