Letest News
चिन्नाराव हॉटेल प्रकरणाने शिर्डीत खळबळ आता शिर्डी नगर परिषद कारवाई करणार का? रक्षाबंधनाचा स्नेहसोहळा शिर्डीत उत्साहात- महिलांनी सुजय विखे यांच्या हातावर बांधली राखी बनावट नंबरच्या बेवारस दुचाकीचा छडा- साई संस्थानच्या सुरक्षा विभागाने शोधला मूळ मालक महाराष्ट्रात तुकाराम मुंडे… तर तेलंगणात वैभव गायकवाड! अहिल्यानगरच्या भूमिपुत्राच्या धडक कारवाईने गुन... पत्रकारितेतील चार दशकांचा प्रदीर्घ प्रवास- असंख्य पत्रकारांचे मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख... “राधाकृष्ण विखेंना हटवा…” जरांगेंच्या निर्णायक आंदोलनापूर्वीच मुख्यमंत्र्यांना थेट पत्र! संघर्षाच्या वाटेवरून यशाची पहिली पायरी चढला गौरव लोकचंदानी-बार कौन्सिलची सनद मिळवत वकिलीच्या नव्या प... शिर्डीतील ‘चिन्नाराव’ हॉटेलच्या जेवणात झुरळ? फोटो समोर येताच खळबळ! “विखे पाटलांना काहीच कळत नाही त्यांना फक्त साखर कारखानाच कळतो!” – मनोज जरांगे पाटील तालुक्याला दोन आमदार पण एकही नाही दमदार!रस्त्यांच्या खड्ड्यांनी हैराण कोपरगावकरांचा संताप फलकावर
क्राईमशिर्डी

शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी

शिर्डी, प्रतिनिधी : सावळीविहीर फाटा परिसरातील एका हॉटेल व्यावसायिकाला पूर्वी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचा राग मनात धरून हॉटेलमध्ये घुसून मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवीगाळ, धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश देवराम ढवळे (वय ४७, रा. सावळीविहीर, ता. राहाता) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते सावळीविहीर फाटा येथे एस. व्ही. कॉर्नर नावाचे हॉटेल चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


दि. ३१ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास आरोपी साईनाथ दिलीप कुसळकर (रा. सावळीविहीर, ता. राहाता) हा मद्यधुंद अवस्थेत हॉटेलवर आला. “तू माझ्याविरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार का दिली? पोलीस माझं काही वाकडं करू शकत नाहीत. तू इथे कसा राहतोस आणि हॉटेल कसं चालवतोस ते पाहतोच,” अशी धमकी देत त्याने फिर्यादीला अश्लील शिवीगाळ करून मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
यावेळी आरोपीने फिर्यादी तसेच त्यांच्या पत्नीचे हातपाय तोडण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास शिर्डी पोलीस करत आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button